फुकट्यांकडून वसूल केला 13.6 कोटींचा दंड 

 Hubli realway department fined Rs 13 crore 61 lakh
Hubli realway department fined Rs 13 crore 61 lakh

बेळगाव : गर्दीचा फायदा घेत व तिकीट तपासनीसाची नजर चुकवून रेल्वेतून विनातिकीट प्रवास, सामानाची बेकायदा वाहतूक व पॅसेंजेर रेल्वेचे तिकीट काढून एक्‍स्प्रेसने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना रेल्वेने दणका दिला आहे. 1 एप्रिल 2018 ते 31 डिसेंबर 2019 या 21 महिन्यात 2 लाख 87 हजार 864 प्रवाशांना पकडण्यात आले. त्यांच्याकडून हुबळी विभागाने 13 कोटी 61 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. 

नैर्ऋत्य रेल्वेच्या अखत्यारीत हुबळी, म्हैसूर व बंगळूर असे तीन विभाग येतात. हुबळी विभागात 115 रेल्वे स्टेशन्स आहेत. त्यात बेळगाव, हुबळी, धारवाड, वास्को, बळ्ळारी, होस्पेट, विजापूर, बागलकोट आदी रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या आर्थिक वर्षात विनातिकीट प्रवास करणाऱ्या 82,975 जणांकडून 3.92 कोटी रुपये, सामानाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या 27,989 जणांकडून 35 लाख तर पॅसेजरचे तिकीट काढून एक्‍स्प्रेसने प्रवास केलेल्या 56,025 जणांकडून 3.45 कोटी रुपये दंड वसूल केला. या आर्थिक वर्षात 1 लाख 66 हजार 989 जणांकडून 7.72 कोटी रुपये दंड वसूल केला. 

1 एप्रिल 2019 ते 31 डिसेंबर 2019 या दरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्या 55,670 जणांकडून 2.9 कोटी रुपये, सामानाची बेकायदा वाहतूक करणाऱ्या 18,474 जणांकडून 23 लाख तर पॅसेंजरचे तिकीट काढून एक्‍सप्रेसने प्रवास केलेल्या 46,731 जणांकडून 2.76 कोटी रुपये दंड वसूल केला आहे. या काळात 1 लाख 20 हजार 875 जणांकडून 5.89 कोटी रुपये वसूल केला आहे. 

वेळेत आणि सुरक्षित प्रवास करण्यासाठी रेल्वेला प्रवाशांकडून पहिली पसंती दिली जाते. त्यामुळे, वर्षाकाठी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या कोटींमध्ये आहे. काही मार्गांवरील ठराविक गाड्यांना नेहमीच गर्दी असते. त्याचा फायदा घेत, तिकीट तपासनीसांची नजर चुकवून अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. मुख्यत: कमी अंतराच्या व कमी तिकिटाच्या प्रवासातच तिकीट न घेता प्रवास करण्याची मानसिकता जास्त आहे. साध्या डब्याचे तिकीट काढून आरक्षित बोगीतून प्रवास करणे, तिकीट न काढता प्रवास करणे, गर्दीत हळूच बाकावर जाऊन बसणे, तिकीट तपासनीस आल्यावर दुसऱ्या डब्यात जाणे, स्टेशन आल्यावर तत्काळ खाली उतरणे असे प्रकार करुन तिकीट चुकविले जाते. हे प्रकार रोखण्यासाठी हुबळी विभागाने विशेष मोहीम राबविली. 


वर्षे                              प्रवासी                 दंड (कोटीत) 
1 एप्रिल 18 ते 31 मार्च     19                  1,66,989*7.72 
1 एप्रिल 19 ते 31 डिसेंबर  19             1,20,875*5.89 


एकूण 2,87,864  13.61 

नैर्ऋत्य रेल्वे विभागात हुबळी विभाग येतो. रेल्वेतून फुकटात प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. हुबळी विभागात 115 रेल्वे स्टेशन येतात. विनातिकीट, सामानाची बेकायदा वाहतूक व पॅसेंजेर रेल्वेचे तिकीट काढून एक्‍सप्रेसने प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यांच्यावर ही कारवाई केली आहे. 
- प्राणेश, जनसंपर्क अधिकारी, नैर्ऋत्य रेल्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com