Vidhan Sabha 2019 भर उन्हांत गर्दी विराट ; माेदी माेदी नावाचा जयघाेष

Narendra Modi's meeting in satara
Narendra Modi's meeting in satara

सातारा : कमळाचे भगवे, धम्मचक्र असलेले निळे झेंडे, नरेंद्र - देवेंद्र लिहिलेल्या भगव्या टोप्या घालून मिरवणारे कार्यकर्ते, हजारो पोलिस अन गळ्यात पक्षाचा मफलर घालून ऑक्‍टोबरच्या ते ही दुपारचे भाजून काढणाऱ्या उन्ह डोक्‍यावर घेऊन सभा मंडपाकडे जथ्याने जाणारे नागरिक आणि कार्यकर्ते. अशा तापलेल्या वातावरणात सातारा जिल्ह्याच्या विविध भागातील नागरिकांनी पंतप्रधान मोदींच्या सभेला विराट गर्दीने शोभा आणली.

आज (गुरुवार) लोकसभेची पोटनिवडणुक आणि विधानसभा निवडणुकीतील जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सैनिक स्कूलच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित केली आहे. सभेचा जिल्ह्याभर ध्वनीक्षेपकातून, प्रसार माध्यमातून मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्यामुळे मोदींच्या सभे विषयी नागरिकांत मोठी उत्सुकता होती. त्यामुळेच जिल्ह्याच्या कामाकोपऱ्यातून कार्यकर्ते, सामान्य नागरिक सभेसाठी साताऱ्यात दाखल होऊ लागले आहेत.
 
पंतप्रधानांच्या सभेच्या पार्श्‍वभुमीवर पोलिसांनी सुरक्षेची मोठी काळजी घेतली आहे. साताऱ्यात महामार्गावरून बॉम्बे रेस्टारंटकडून, पोवई नाक्‍याकडून सैनिक स्कूलकडे येणारे सारे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले होते. सकाळी 11 नंतर रस्त्याने सभा स्थळी जाणाऱ्यांची संख्या वाढली होती. त्यामुळे आज सातारा - कोरेगाव रस्त्यावरील न्यायालय ते सैनिक स्कूल अन महामार्ग ते सैनिक स्कूल या अंतरात नागरीकांचे लोंढे चाललेले दिसत होते.
 
सैनिक स्कूलच्या मैदानाच्या सभोवताली पोलिसांचा खडा पहारा आहे. तसेच परिसरातील सर्व इमारतींवर बंदुकधारी पोलिस तैनात आहेत. सभामंडपात जाण्यासाठी दोन गेट आहेत. प्रत्यक्ष सभामंडपात पोचेपर्यंत किमान तीन ठिकाणी प्रत्येकाची मशीनद्वारे तपासणी केली जात आहे. वाटेवर बॉम्बशोधक पथकही बसले होते. दोन वाजता मुख्य सभा मंडपातील खुर्च्या भरून गेल्या. त्यानंतर बाजूला केलेल्या बैठक व्यवस्थेच्या मंडपात नागरिकांना प्रवेश दिला जाऊ लागता. तेथे नागरिकांना तपासणी करून सोडण्यासाठी मंडपाबाहेर किमान 25 धातुशोधक चौकटी अन शंभरावर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा मंडपही भरून जाऊ लागता होता. मात्र बाहेर रस्त्यावर प्रवेशासाठी नागरींकांची झुंबड उडाली होती. नागरिकांच्या प्रवेश मिळविण्याच्या धडपडीशी पोलिसांना सामना करावा लागत होता. परंतु ऑक्‍टोबरच्या रणरणत्या उन्हातही नागरिकांची गर्दी वाढतच गेली. 

किल्याची तटबंदी अन शिवमुद्रा
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी तेवढ्याच ताकदीचे दर्जेदार व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. व्यासपीठाला किल्लयाच्या तटबंदीचा रुप दिले आहे. व्यासपीठाच्या एका बाजूस छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तर दुसऱ्या बाजूस शिवमुद्रेची मोठी प्रतिकृती लावण्यात आली आहे. साताऱ्याची शिवभूमी, लोकसभेचे उमेदवार असलेले उदयनराजे भोसले, महायुतीत असलेली शिवसेना या पार्श्‍वभूमीवर व्यासपीठाची कल्पकतेने वाढविलेली शोभा आज मंडपात चर्चेचा विषय ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com