हम दो हमारे दो...ते "हम दो हमारे सात'.... 

Hum do hamare do ... te "hum do hamare seven '....
Hum do hamare do ... te "hum do hamare seven '....

इस्लामपूर : हम दो हमारे दो...ते "हम दो हमारा एक' असा आता सुशिक्षितांचा प्रवास सुरू आहे. जबाबदारीच नको म्हणूनही महानगरी संस्कृतीत मुलंच होऊ न देणारेही आहेत. अशा काळात आपल्या पोटच्या दोन मुलांसह अन्य पाच मुलांना दत्तक घेत त्यांची सर्वस्वी जबाबदारी उचलणारे येथील प्रा. सूरज आणि साजिदा चौगुले या दाम्पत्याने समाजापुढे आपल्या वर्तनातून धडा घालून दिला आहे. कुटुंब आणि मनानेही माणसं अधिक संकुचित होत असल्याच्या भोवतालात माणुसकीची ज्योत तेवत असल्याबद्दल दिलासा देणारी ही गोष्ट आहे. 

प्रा. चौगुले ऐतवडे खुर्दच्या वारणा महाविद्यालयात हिंदी विभागप्रमुख आहेत. सौ. साजिदाही लहान मुलांची शाळा चालवतात. दोघांनी लग्नानंतर एका अनाथ मुलीला दत्तक घ्यायचं ठरवलं आणि त्युासार 2008 मध्ये कोल्हापूरच्या बाल संकुलातून दोन वर्षांच्या "मिसबा'ला दत्तक घेतले. चौगुले यांना अमन (वय 10) आणि अल्फीया (वय 5) अशी दोन अपत्ये आहेत. मात्र आजघडीला त्यांच्या कुटुंबाची सदस्य संख्या नऊ आहे. त्याची ही कथा.
 
2010 मध्ये एका अंगणवाडी मदतनीस महिलेने आत्महत्या केली. तिचा पती संसार सोडून परागंदा झालेला. तिच्या मृत्यूने दोन मुली आणि एक मुलगा अशी सारी अनाथ झाली. चौगुले दाम्पत्याने पुढे येत या तीनही मुलांची जबाबदारी घेत त्यांचे पालकत्व घेतले. आता ही मुले नाझनीन (वय 20), सिमरन (वय 19) या दोन मुली व मुलगा अजीम (वय 14) त्यांच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत. 

या कुटुंबात तीन वर्षांपूर्वी अश्विनी दाखल झाली. बालवयात या मुलीचा आईकडूनच छळ होत असल्याची विदारक घटना पुढे आली. त्याहीवेळी या दांम्पत्याने पुढे धाव घेत तिला वसतिगृह मिळवून दिले आणि आता ती वसतीगृहात राहत असली तरी तिचं हक्काचं घर चौगुले यांचेच आहे. अधूनमधून ती हक्काने घरी येते, राहते. तिलाही हक्काचं कुटुंब मिळेपर्यंत तिची जबाबदारी घ्यायचा त्यांचा संकल्प आहे. अशाच अनाथ वसतिगृहात राहणारी आणखी एक मुलगी "रिझा' (वय 16) आता चौगुले कुटुंबाचा अलीकडेच भाग झाली आहे. दहावीनंतरच्या तिच्या पुनर्वसनासाठी म्हणून तिला या कुटुंबाने रितसर दत्तक घेतले असून तिचीही त्यांनी आता सर्व जबाबदारी घेतलीय. 

अनाथाश्रमात मुलं वाढवणे निकोप समाजव्यवस्थेसाठी चांगले नाही. मूल कुटुंबात वाढले तर त्याच्यात समाजाबद्दलची आस्था तयार होते. प्रगत देशांप्रमाणे आपल्याकडेही "फॉस्टर केअर' संकल्पना रुजली आहे. अनाथांना ऐपत असणाऱ्यांनी मायेने कुटुंबात वाढवल्यास बालसुधारगृहाची गरजच पडणार नाही. 
- प्रा. डॉ. सूरज चौगुले, इस्लामपूर

संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com