#SataraFlood माणूसकीचा `पूर`; जेवण,नाष्टा,चहा माेफत

तानाजी पवार 
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

राष्ट्रीय महामार्गावरील वाहनधारकांसाठी वहागावकरांनी मोफत अन्नदानाचा उपक्रम राबवून माणूसकीचे दर्शन घडविले.

वहागाव: संततधार पावसामुळे सातारा जिल्ह्य़ातील विविध धरणातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे तसेच जिल्ह्य़ातील पूर पस्थितीमुळे जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्ग 4 वरील अवजड वाहतूक करणारी यंत्रणा पूर्ण स्तब्ध झाली आहे. प्रशासनाने महामार्गावरील अवजड वहातूक करणारी वाहने जागा मिळेल त्या ठिकाणी उभी केली असल्याने या वाहनधारकांची पुरतीच पंचाईत झाली आहे. या वाहनधारकांसमोर मूलभूत सोयी - सुविधांचा पेच उभा राहिला होता. अशातच त्यांच्या मदतीसाठी कराड तालुक्यातील वहागावकरांची माणुसकी धावून आली. परिसरातील ग्रामस्थांनी या वाहनधारकांना मोफत चहा, नाश्ता व जेवणाची सोय करुन आपल्यातील माणूसकी जपली आहे. 
दरमयान रात्रीच्या वेळी जेवण करण्याचे नियोजन करून प्रत्यक्ष कृतीस सुरुवातही केली. वहागावकरांनी दाखविलेल्या माणूसकीच्या दर्शनामुळे वाहनधारकांनी वहागावकरांचे मनापासून आभार मानले. गावकऱ्यांनी एकञित येऊन दाखविलेल्या माणुसकीच्या दर्शनामुळे अनेकांनी आपल्या डोळ्यातील भाव लपवता आला नाही, ग्रामस्थांच्या मदतीमुळे यावेळी वाहनधारकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. 

वहागावकरांच्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक. 

महामार्गावरील वाहनधारकांसाठी वहागावकरांनी दाखविलेल्या दातृत्वाबद्दल परिसरातील गावांतून व प्रशासनाकडून वहागावकरांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहे. वहागावकरांचा हा उपक्रम नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Humanity flooded; Dining, breakfast, tea free