esakal | शहीद मॅरेथॉनमध्ये शेकडो लोक धावले 

बोलून बातमी शोधा

Marathon

सांगली ः येथील शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशन आयोजित आठवी शहीद मॅरेथॉन आज झाली. हजारो सांगलीकर स्पर्धेत सहभागी झाले. विश्रामबाग चौकातून वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा झाली. 

शहीद मॅरेथॉनमध्ये शेकडो लोक धावले 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली ः येथील शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशन आयोजित आठवी शहीद मॅरेथॉन आज झाली. हजारो सांगलीकर स्पर्धेत सहभागी झाले. विश्रामबाग चौकातून वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा झाली. 


यावर्षी शहीद मॅरेथॉनची असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल मॅरेथॉन आणि इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ऍथलेटिक्‍स फेडरेशनकडे नोंद झाली आहे. त्यांचे मानांकन मिळाल्यामुळे या स्पर्धेला आता आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. आफ्रिकन देशातील मॅरेथॉनपटू या स्पर्धेचे आकर्षण. पहाटे 5.30 ला स्पर्धा सुरु झाली. 

महिला सक्षमीकरणासाठीही महिला धाव घेतील. एकूण तीन लाखांची पारितोषिके देण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांसाठी दोन किलोमीटर ड्रीम रन व चार किलोमीटर चॅम्पियन रन असेल. पाच किलोमीटर, दहा किलोमीटर, 21 किलोमीटर अशा पाच गटात स्पर्धा झाली. 18 ते 30, पुढे 40, 50, 60 आणि त्यावरील वयोगटात महिला, पुरुष होते. हाफ मॅरेथॉनसाठी विश्रामबाग ते मिरज गांधी चौक, पुन्हा विश्रामबाग तेथून राम मंदीर, राजवाडा, कापडपेठ, टिळक चौक असा मार्ग होता.

त्यासाठी वैद्यकीय सेवा, वाहतूक व्यवस्था, स्वयंसेवक यांची तयारी पूर्ण झाली आहे.'' संयोजन समितीचे अध्यक्ष समित कदम, प्रदीप सुतार, दीपक पाटील, अक्रम मुजावर, वीरेंद्र हळींगळे, देवदास चव्हाण आदींसह संपूर्ण टीम नियोजन केले.