महामार्गावर रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची उपासमार

चंद्रकांत देवकते
गुरुवार, 17 मे 2018

मोहोळ - महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांचा दीड ते दोन महिन्यापासुन ठेकेदाराने पगार दिलेला नाही. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या या मजुरांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

मोहोळ - महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांचा दीड ते दोन महिन्यापासुन ठेकेदाराने पगार दिलेला नाही. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या या मजुरांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. 

राष्ट्रीय महामार्ग क्रं ६५ वर देवडी फाटा ते सोलापूर मार्केट यार्ड या दरम्यान रस्त्याची स्वच्छता, झाडांची निगा, स्वच्छतागृह आदी कामासाठी आसपासच्या गावातील  रोजंदारीवर २० ते २५ स्त्री-पुरूष मजुर काम करित आहेत. पुरूषाला २५० रूपये तर महिलांना १७० रूपये रोजगार देण्यात येतो. यांचे टेंडर खाजगी व्यक्तीला दिले जाते. बार्शी येथील शिंदे यांच्याकडे मजुर पुरवठा करण्याबाबतचे टेंडर होते. सध्या टेंडरच मालक बदलला आहे. पंरतु पुर्वीच्या शिंदे नावाच्या ठेकेदारांने या    मजुराकडुन महामार्गाचे काम करून घेऊन त्याच्या हक्काचे वेतन दिले नाही, त्यामुळे या मजुरांच्यावर त्यांच्या कुंटुबातील वृद्ध व्यक्ती, लहान मुले यांच्यावर  उपासमारीची वेळ आली आहे. 

याबाबत मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असुन, आमच्या न्याय हक्काचे वेतन न मिळाल्यास रस्ता रोको आंदोलनही करण्याचा इशारा संबधित मजुरांनी निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी शिवमाथाडी कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष दादासाहेब पवार, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सतीश काळे उपस्थित होते. या निवेदनावर हरिभाऊ माळी, प्रविण वाघमोडे, सचीन गायकवाड, ज्योती वाघमारे, रेखा खरात, खलील तांबोळी, लक्ष्मण जगताप, नंदा शिराळ, रशीद तांबोळी आदीसह इतरही  मजुरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Hunger for laborers working on wages