भाजीत मीठ जास्त झाल्याने पतीने कात्रीने कापले पत्नीचे केस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

सोलापूर : एक महिन्यापूर्वी नातेवाईकाच्या लग्नाला गेल्यानंतर ब्युटीपार्लरमध्ये जावून केस कापल्याच्या कारणावरून नान्नज येथील शेतमजुर पतीने रागाच्या भरात कात्रीने पत्नीचे केस कापल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, भाजीत मीठ का जास्त का घातले म्हणून वाद घालून मारहाण केल्याप्रकरणी विवाहितेने पती आणि सासूविरोधात तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी रविवारी सकाळी पती आणि सासूला ताब्यात घेऊन जबाब नोंदविला आहे. 

पती आरिफ शेख, सासू अंजुमन शेख (रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. विवाहितेचा छळ आणि मारहाण केल्याचा गुन्हा दोघांवर दाखल झाला आहे. रुकसाना शेख यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत विवाहिता रुकसाना आणि आरिफ या दोघांचे लग्न 2013 मध्ये झाले आहे. किरकोळ कारणावरून पती नेहमीच रुकसाना हिला त्रास द्यायचा. पैशाची मागणी करून तिचा छळ केला. बुधवारी (ता. 11) सकाळी आठच्या सुमारास रुकसान हिने पतीला जेवायला वाढले. भाजीत मीठ जास्त झाले आहे असे म्हणून त्याने पत्नीला मारहाण केली. पती आणि सासूने कात्रीने डोक्‍यावर केस कापल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी आरिफ आणि अंजुमन या दोघांना ताब्यात घेऊन तालुका पोलिस ठाण्यात आले. दोघांचा जबाब नोंदविण्यात आला. एक महिन्यापूर्वी नातेवाईकाच्या लग्नाला गेल्यानंतर रुकसान हिने ब्युटीपार्लरमध्ये जावून केस कापले होते. सासरी परत आल्यानंतर पती आरिफ याने याबाबत विचारणा केली. त्या कारणावरून दोघांत भांडण झाले. मला न विचारता ब्युटीपार्लरमध्ये जावून केस का कापले म्हणून आरिफ याने रागाच्या भरात कात्रीने केस कापल्याचे जबाबातून समोर आल्याची माहिती पोलिस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली आहे. 

पती आरिफ याने मला न विचारता ब्युटीपार्लरमध्ये जावून केस का कापले म्हणून पत्नी रुकसान हिच्याशी वाद घातला. त्याच कारणावरून कात्रीने तिचे कापल्याचे जबाबातून समोर आले आहे. याप्रकरणी पती आणि सासूला ताब्यात घेतले असून तपास चालू आहे. 
- किशोर नावंदे, पोलिस निरीक्षक 

यशदाकडे केली तक्रार 
रुकसान यांनी पतीकडून छळ होत असल्याची तक्रार नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या यशदा फाऊंडेशनकडे केली होती. तक्रारीची दखल घेऊन पटेल यांनी रुकसान यांना पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी फिर्याद घेऊन हा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: husband cuts wife's hair over excess salt in food