पतीचे निधन झाले अन् पोरांचे भविष्य झाले अंधकारमय

solapur
solapur

उपळाई बुद्रूक (सोलापुर) - चार-चौघींसारखंच त्यांनी सुद्धा संसाराचं स्वप्न रंगवलं होतं. स्वप्नांना सोनेरी किनार असली तरी त्यांचा गाभा वेदनांनी भरलेला असतो. हे मात्र त्यांना ठाऊक नव्हतं. उपळाई बुद्रूक येथील सुनीता तानाजी माळी यांची दोन्ही मुल अंपग व मतिमंद त्यामुळे ते निराश न होता. त्यांनी मुलांचे भविष्य उज्वल करण्यासाठी वेगवेगळ्या दवाखान्यात उपचार सुरू केले होते. याकाळातच पतीचे अकाली निधन झाले. अन् मुलांचे भविष्य अंधकारमय झाले. सुमन यांच्यासमोर मुलांच्या उपचाराचा व रोजीरोटीचा प्रश्न उभा राहिला. परंतु, गेल्या २० वर्षापासुन त्या एकट्या दोन्ही मुलांचा सांभाळ करत आहेत. पण त्यांच्या पश्चात मुलांचे काय असा प्रश्न त्यांना भेडसावत आहे. त्यात शासनाकडुन कोणताही लाभ मिळत नाही हे आश्चर्यकारक.

सुमन तानाजी माळी यांची घरची परिस्थिती अत्यंत बिकट त्यांना एक मुलगी व सचिन व धनाजी अशी दोन मुले. परंतु, दोन्ही मुले जन्मातच अंपग व मतिमंद असल्याने. सुमन व पती तानाजी माळी यांनी त्या दोघांवर नामांकित दवाखान्यात वैद्यकीय उपचार सुरू केले. जेणेकरून आपल्या मुलांना देखील समाजात ताट मानाने इतरप्रमाणे जगता येईल. असे स्वप्न उराशी बाळगून ते प्रयत्न करत होते. तानाजी माळी हे वायमनच्या हाताखाली हेल्पर म्हणुन काम करत. त्यांच्या कमाईतुन घर प्रपंच व मुलांचा उपचार सुरू होता. परंतु नियतीला काही वेगळेच मान्य होते. तानाजी यांचे लाईटचे काम करत असताना २००५ साली निधन झाले. घराचा कर्ता माणुस गेल्याने संसाराचा गाडा व मुलांच्या उपचाराचा सर्व भार सुमन यांच्यावर पडला. एकीकडे पतीच्या निधनाचे दुःख तर दुसरीकडे मुलांच्या भविष्याबद्दल काय असा प्रश्न उभा असताना. त्यांनी मुलांवर सर्वत्र नामांकित शासकीय-निमशासकीय दवाखान्यात उपचार सुरू ठेवले परंतु त्यांच्या नशीबी अपयशच आले. तानाजी यांचे निधन होऊन १४ वर्षे झाले. त्यांचा धनाजी हा मुलगा २५ तर सचिन २२ वर्षांचा आहे. परंतु धक्कादायक म्हणजे अद्याप 'शासनाकडून यांना ना अंपगात्वाचे प्रमाणपत्र मिळाले. ना कोणत्याही उपचारासाठी मदत' मिळाली. 

धनाजी अंपग व मतिमंद तर सचिन देखील मतिमंद व दुष्टी थोडी कमी. सुमन यांनी दोघांना मतिमंद अंपगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सोलापुर व संबधित विभागाच्या कार्यालयाच्या पायर्यां झिजवल्या. पण संबधित अधिकारी व कार्यलयातील कुणीही यांची दखल घेतली नाही. या - ना त्या कारणाने सतत माघारी पाठवण्यात आले. परिणामी हे दोघे भाऊ आज शासनाच्या योजनापासुन वंचित आहेत. एकीकडे कित्येक जणांना अंपगात्वाची बोगस प्रमाणपत्र देऊन लाभर्थी केले जातात. परंतु खरे लाभार्थीच या योजनेपासुन वंचित आहेत. सुमन यांना हाताला काम मिळाले तरच या घरात चुल पेटते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु त्यांनी देखील जिद्द सोडली नाही. पतीचे मृत्यू होऊन १४ वर्षे उलटली तरी देखील त्या मुलांचा चांगल्या रितीने सांभाळ करतात. पण त्यांच्या पश्चात त्या मुलांचे काय असा प्रश्न त्यांना सारखा भेडसावतो. या मुलांना शासनाच्या व माणसुकीच्या मदतीची गरज आहे. 

दोन्ही भावांचे एकमेकांवर प्रेम
- धनाजी हा अंपग असल्याने घरून बाहेर शकत नाही. तर सचिन मतिमंद जरी असला तरी ती इकडे-तिकडे फिरतो. गावात त्याला कुणी खाण्यासाठी काहीही दिले तर तो स्वता:च्या भावासाठी देखील घरी आणतो. यातुन दोघांचे प्रेम दिसते. कुणाला मदत करायची असल्यास या ९९२१४८९६२५ नंबरवरती संपर्क साधावा.

शेतमजुरी करून घर चालवते. शासनाच्या दारी वारंवार हेलपाटे मारून देखील पदरी निराशाच आली आहे. मी आहे तोपर्यंत मुलांचा सांभाळ करणारच पुढेचे पुढे देव जाणे..
- सुनिता तानाजी माळी, आई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com