पतीनेच घातला पत्नीच्या वर्मी घाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

उंब्रज (ता. कऱ्हाड) : झोपलेल्या पत्नीच्या पतीनेच तिच्यावर कुऱ्हाडीचा घाव घालून निर्घृण खून केला. पतीने पत्नीच्या पतीने कुऱ्हाडीने गळ्यावर वर्मी घाव घातला. शशिकला आनंदा सातपुते (वय 50 रा. चोरे) असे पत्नीचे नाव आहे. आनंदा दादू सातपुते (55 रा. चोरे) असे खुन करणाऱ्या पतीचे नाव आहे. चोरे (ता.कऱ्हाड) येथे आज दुपारी अडीचच्या सुमारास घडली. खूनानंतर पतीने घटनास्थळावरून पळून जाताना शिवारातील विहीरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात पती आनंदा जखमी आहे. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

पोलिस व घटनास्थलावरील माहिती अशी की, चोरे येथे राहणाऱ्या आनंदा व शशिकला यांच्या कुटूंबात घडलेल्या ह्रदयद्रावक घटना घडली. त्या घटनेने परिसर सुन्न झाला आहे. शशिकला घरी दुपारी झोपल्या होत्या. त्यावेळी पती आनंदा तेथे आळे. त्यावेळी त्यांच्यासोबत कुऱ्हाड होती. त्याच कुऱ्हाडीने त्यांनी शशिकला यांच्यावर वार केला. तो वार थेट त्यांच्या गळ्यावर वर्मी लागला. त्यात शशिकला यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनतर आनंदाने घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती पसरताच खळबळ उडाली. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पाहताच आनंद पळून जावू लागला. पोलिस मागे आहेत. हे लक्षात येताच व पोलीसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने शिवारातील विहरीत उडी घेतली. यामध्ये आनंदा जखमी झाला. पोलिसांनी पुन्हा शर्थीचे प्रय़त्न करून आंदाला वाचवले. त्यानंतर आनंदास उपचारासाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. शशिकला यांना दोन मुलगे, एक मुलगी आहे. 

कारण अस्पष्टच...
आनंदाने पत्नीचा खून का केला त्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे त्याला नेहमी पैसे हवे होते. त्यातूनच खून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसानी वर्तविला आहे. पत्नीच्या खूनानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याला वाचविण्यात यश आले आहे. तो अद्यापही शुद्धीवर आळा नव्हता. त्यामुळे खूनाचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नव्हते.

Web Title: husband killed his wife at Umbraj