कऱ्हाडजवळ पत्नीचा पतीने केला गळा आवळून खून 

karhad
karhad

कऱ्हाड : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पलायन केलेल्या गोळेश्वर येथील पतीस शहर पोलिसांनी कण्हेर धरण परिसरात शिताफीने अटक केली. फिरोज सलीम मुल्ला (वय 33, रा. बापूजी साळुंखेनगर, गोळेश्वर) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे. शबाना फिरोज मुल्ला (30) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

येथील गुन्हा प्रकटीकरण विभागाचे फौजदार भारत चंदनशिवे, पोलिस हवालदार सतीश जाधव, नितीन येळवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फिरोज यास शिताफीने अटक केली. शनिवारी मध्यरात्रीनंतर खूनाचा प्रकार घडला तो आज सकाळी उघडकीस आला. त्यानंतर काही तासाच्या आतच तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी त्याचा छडा लावून संशयीत पतीस आटक केली.

पोलिसांनी सांगितले की, फिरोज मुल्ला व शबाना मुल्ला यांचे वडगाव हवेली मुळगाव आहे. फिरोजचे वडगाव हवेली येथे चिकन सेंटर आहे. काही महिन्यापूर्वी पत्नी शबाना मुल्ला हिचे अनैतिक संबंध असल्‍याचा संशय फिरोज याला होता. त्यावरून त्यांच्या वाद व भाडण होत होते. त्यानंतर दोघांनीही सामंजस्याची भुमिका घेतली होती. त्या वादावर पडदा टाकून दोघेही एकत्रीत गोळेश्वर येथील बापूजी साळुंखे नगरमध्ये  भाड्याच्या खोलीत राहत होते. तेथे काही दिवस राहिल्यानंतर पुन्हा फिरोजला तीच्या चारित्र्याचा संशय होता. मुळात पत्नी शबानाच्या सांगण्यावरून गोळेश्वर येथील बापूजी साळुंखे नगरात भाड्याची खोली घेऊन ते राहत होते. तरीही तेथे त्यांच्यात वाद सुरूच होते. काल (शनिवारी) रात्री पुन्हा चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. रात्रीचा वाद विकोपाला गेला की त्यावेळी चिडलेल्या फिरोजने मध्यरात्री रागाच्या भरात पत्नी शबाना झोपेत असतानाच तीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर तो तेथून तेथून पसार झाला. 

भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या शबानाचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. तेथील पंचानामा केला. त्यांना पती पत्नीत वाद झाल्याचे तेथे समजले. शबानाच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. त्यावेळी तीचा गळा आवळल्याने मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे पती फिरोज यानेच तीचा खून केल्याचा पोलिसांचा संशय बळावला. संशयित पतीला ताब्यात घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली. त्यावेळी तो कण्हेर धरण येथे गेल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली. फौजदार चंदनशिवे, हवलादार जाधव, येळवे, मोरे असे पथक त्वरीत तिकडे रवाना झाले. फिरोज तेथे असल्याच्या माहितीची खात्री केली. तेथे त्याला सापळा रचून पोलिसांनी अटक केली. रात्री त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यास अटकही करण्यात आली आहे. 

खूनानंतर पार्टीत दंग असताना पतीस अटक 
फिरोज व शबाना यांच्यात वाद होत होता. तो वाद विकोपाला गेल्यानेच तीचा खून केल्याची कबुली पती फिरोजने पोलिसांना दिली आहे. खून केल्यानंतर घरातून पसार झालेला फिरोज थेट कण्हेर धरणावर काही मित्रांकडे गेला होता. कऱ्हाडला काय करून आलो आहे, याची जाणीवही त्याने कण्हेर येथील लोकांना दिली नव्हती. तो त्यांच्यात मिसळून पार्टी करण्याच्या बेतात होता. माशांचा स्वयंपाक सुरू असतानाच पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली. त्यावेळीही फिरोजला पत्नी शबानाचा खून केल्याबद्दल जराही दुःख वाटत नव्हते. पोलिस ठाण्यातही त्याने सगळ्या गुन्ह्याची कबुली अतीशय थंडपणे दिली. त्यामुळे पोलिसही त्यांच्या अशा वागण्याचे चक्रावून गेले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com