माझी प्रकृती स्थिर : नितीन गडकरी

I am doing well now says Nitin Gadkari
I am doing well now says Nitin Gadkari

राहुरी विद्यापीठ (नगर) : रक्तातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने मला त्रास झाला होता. डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केले आहेत. आता माझी स्थिर आहे, अशा शब्दांत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्वत:च्या प्रकृतीविषयी माहिती दिली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात दीक्षांत सोहळ्यातील भाषणानंतर नितीन गडकरी यांना अचानक चक्कर येऊन ते स्टेजवरच कोसळले होते. राज्यपाल व उपस्थितांनी मदत केल्यामुळे ते सावरले, मात्र ते पुन्हा कोसळले होते. डॉक्‍टरांनी प्रथमोपचार केल्यानंतर पाच मिनिटांत ते सावरले व दीक्षांत समारंभातून चालत बाहेर पडले. शिर्डी दौरा रद्द करण्यात आला आहे.

प्रथमोपचार घेतल्यानंतर विद्यापीठाच्या विशेष अतिथीगृहाकडे ते रवाना झाले. तेथे त्यांच्या पुढील चाचण्या करण्यात आल्या. रक्तातील साखर कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. मात्र पुढील उपचारासाठी त्यांना विशेष विमानाने नागपुरला हलवण्यात येणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com