शिवसेनेचा नवरदेव मीच - विजय औटी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

टाकळी ढोकेश्वर (नगर) : शिवसेना-भाजप युती होणार आहे, त्याची चिंता करू नका. आगामी लढाई दोन शिवसैनिकांची आहे. येथे कॉंग्रेस, राष्ट्रवादीचा काही संबंध नाही. शिवसेना व ठाकरे कुटुंब माझ्यासोबत आहे. तुम्ही प्रचार सुरू करा. अधिकृत नवरदेव मीच आहे. त्यात बदल नाही, असे ठामपणे सांगत आपल्याच उमेदवारीवर विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी शिक्कामोर्तब केले.

पारनेर तालुक्‍यातील पळसपूर, कन्हेर, म्हसोबा झाप, विरोली, काताळवेढे येथील सभामंडप, रस्ते, जलशुद्धीकरण प्रकल्प, शाळाखोल्यांसह अन्य 88 लाख रुपयांच्या विकासकामांचा प्रारंभ औटी यांच्या हस्ते झाला. त्या वेळी
काताळवेढ्यातील कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते होते.

औटी म्हणाले, ""ज्यांना आपल्याबरोबर यायचे आहे, त्यांना आपल्यात घ्या. उद्याच्या काळात विकासाच्या दृष्टीने आपला काळ महत्त्वाचा आहे. सत्ता शिवसेना-भाजप युतीची येणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या मतदारसंघाकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. आपण आपली उंची वाढवली आहे. सत्तेची दारे आपल्याला खुली झालीत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभेचे उपाध्यक्षपद देऊन जो गौरव केला, तो माझ्या मतदारसंघातील सर्वांचा गौरव आहे.''
या वेळी उद्योजक शिवाजी बेलकर, सुनीता मुळे, सुनीता आहेर, नितीन शेळके, सरपंच मंदा गाजरे, ठका कडूसकर, लहू गुंड आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I am a Shiv Sena candidate: Auti