"मला तुरुंगात जायचे नाही' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 डिसेंबर 2019

महापालिकेचा पथदिव्यांच्या वीजबिलावर होणारा खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण शहरात एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. अशा प्रकारचा प्रकल्प राबविलेल्या राज्यातील इतर महापालिकांची माहिती घेण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी विद्युत विभागाला दिले आहेत.

नगर : मला विद्युत विभाग प्रमुख म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे. आपण वरिष्ठ अभियंता असून, विद्युत विभागाचा कुठलाही अनुभव आपणाला नाही. त्यामुळे माहिती नसलेल्या कोणत्याही प्रस्तावावर आपण सही करणार नाही. मला तुरुंगात जायचे नाही. त्यामुळे विद्युत विभागाच्या प्रमुखपदी त्या विभागाची माहिती असलेला विद्युत अभियंता नेमावा, अशी मागणी नगर महापालिकेतील विद्युत विभागातील अभियंता कल्याण बल्लाळ यांनी केली. 

municipal corporation

 

शहरातील पथदिव्यांबाबतच्या वारंवार येणाऱ्या तक्रारींसंदर्भात महापौर वाकळे यांनी शुक्रवारी (ता. 29) सायंकाळी विद्युत विभागाची बैठक घेतली. या प्रसंगी बल्लाळ बोलत होते. या बैठकीत नगरसेवक विनित पाऊलबुधे, सुनील त्र्यंबके, रवींद्र बारस्कर, बाळासाहेब पवार, अजिंक्‍य बोरकर, संजय ढोणे, सूरज शेळके, सतीश शिंदे, कल्याण बल्लाळ यांच्यासह विद्युत विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा

या चर्चेत विद्युत विभागाच्या सध्या सुरू असलेल्या कामकाजाबाबत महापौर वाकळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्युत विभागाचे कर्मचारी व्यवस्थित काम करत नाहीत. नगरसेवकांचे फोन उचलत नाहीत, यापुढील काळात हे खपवून घेतले जाणार नाही. कामचुकारांवर कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला. 

शहरातील पथदिवे एलईडी होणार 
महापालिकेचा पथदिव्यांच्या वीजबिलावर होणारा खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण शहरात एलईडी दिवे बसविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. अशा प्रकारचा प्रकल्प राबविलेल्या राज्यातील इतर महापालिकांची माहिती घेण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी विद्युत विभागाला दिले आहेत.

पथदिव्यांच्या वीजबिलाचा खर्च कमी करण्यासाठी संपूर्ण शहरात एलईडी दिवे लावण्याचा प्रस्ताव आहे. हे दिवे लावल्यानंतर किती वीजबचत होईल, तसेच एलईडी दिव्यांसाठी महापालिकेला किती खर्च येईल, कोणत्या रस्त्यावर किती वॉटचे दिवे लावावे लागतील, कॉलनीत किती वॉटचे दिवे लागतील याचा अभ्यास करून परिपूर्ण प्रस्ताव तातडीने सादर करण्यात यावा, असे आदेशही महापौर वाकळे यांनी दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "I don't want to go to jail"