Video ' आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल '

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

पाचगणीच्या पर्यटनाला वाव मिळावा, शैक्षणिक केंद्र म्हणून अधिक नावलौकिक मिळावा, सातासमुद्रा पलीकडे या शहराची महती अधिक पोहचली पाहिजे या अनुषंगाने पाचगणीकर एका छता खाली एकत्र येऊन हा दैदिप्यमान सोहळा पार पाडतात.

पाचगणी : कला , सांस्कृतिक साहित्य अशा विविध अष्टपैलूंनी नटलेल्या 'आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल' सोहळ्याचा उत्साह शिघेला पोचला आहे.

या साेहळ्या निमित्त 'आय लव्ह पाचगणी फेस्टिव्हल' समितीला रोटरी क्लब पाचगणी , पाचगणी गिरिस्थान पालिका, पाचगणी पोलीस स्टेशन, पाचगणी व्यापारी असोसिएशन, पाचगणी हॉटेल असोसिएशन, पाचगणी स्कूल असोसिएशन, एस. ओ. एस. संस्था व 950 बिग एफएम यांची मोलाची साथ लाभ आहे.

अभिनेत्यांची उदघाटन साेहळ्यास उपस्थिती

येत्या 29 , 30 नोव्हेंबर व एक डिसेंबरला असे तीन दिवस हा सोहळा हाेणार आहे. शुक्रवारी (ता. 29) (कै.) भाऊसाहेब
भिलारे क्रीडाभूमी येथे नृत्य, गायन व कलागुणांचा कार्यक्रम हाेईल. त्याचे उदघाटन रोटरी विभाग 3132 चे प्रांतपाल
सुहास वैद्य तसेच अगं बाई सासूबाई फेम गिरीश ओक व कौशल इमानदार यांच्या उपस्थित हाेईल.

वॉकिंग प्लाझा, विंटेज कार, मोटोरबाईक आदींचे प्रदर्शन

या तिन्ही दिवशी सायंकाळी सातपासून आगळी वेगळी मेजवानी देणाऱ्या वॉकिंग प्लाझाचे व वाद्यांच्या कार्यक्रमाचे
आयोजन शिवाजी चौक व बाजारपेठेत करण्यात आले आहे.
 
आर्ट क्राफ्ट प्रदर्शना अंतर्गत पाचगणी क्लब येथे विंटेज कार व जुन्या मोटोरबाईकचे प्रदर्शन , शिल्प कलेचे दर्शन होणार
असून दुर्मिळ व अनमोल चित्र पाहवयास मिळणार आहेत. 

पाचगणी क्लब येथे पहिल्या दिवसापासून सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. टाऊन
हॉल येथे रंगावली प्रदर्शनाचे आयोजन करणयात आले आहे.

इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हलचा लुटा आनंद

शनिवारी (ता.29) व रविवारी (ता. 30) सकाळी 10 ते
रात्री 10.00 पर्यंत आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार म्हणून नावलौकिक असलेल्या टेबललँड येथे निरभ्र आकाशात इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हलचे आयाेजन करण्यात आले आहे.
याध्ये रंगीबेरंगी, विविध आकाराच्या स्वचंद विहार करणाऱ्या पतंग उपस्थितांना वेगळ्या विश्वात नेतील. 

माला हॉटेल्स येथे सायंकाळी चारपासून झुंबा डान्स, छत्रपती शिवाजी चौकात साडे चार वाजता मलखांब तसेच महिला व पुरुषांचा सहभाग असलेली रस्सी खेच अर्थात 'टग ऑफ वॉर' स्पर्धा हाेईल.

रविवारी सकाळी ट्रेजर हंटचा न्यारा आनंद मिळणार आहे. समाराेपाच्या दिवशी पुरस्कारांची खैरात करणाऱ्या लकी ड्रॉ व वॉकींग प्लाझाला लाईव्ह बँडची अजोड साथ मिळणार आहे.


 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Love Panchgani Festival