मुख्यमंत्र्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघतो : विजय शिवतारे

रुपेश कदम
शुक्रवार, 17 मे 2019

दहिवडी : माणमध्ये एक्कावन पैकी एकतीस चारा छावण्या सुरु झाल्या आहेत. उर्वरित वीस चारा छावण्या अठ्ठेचाळीस तासात सुरु करणार आहोत. पालकमंत्री म्हणून मी छावण्यांची जबाबदारी स्विकारण्यास तयार आहे. नियमांचा बागुलबुवा न करता छावण्या सुरु करा. मुख्यमंत्र्यांना काय उत्तर द्यायचं ते मी बघतो. कॅमेरे लावणे महत्वाचे नसून जनावरे वाचविणे महत्वाचे आहे.
असे प्रतिपादन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले. तसेच नवीन दहा गावांसाठी सक्षम संस्थांना बोलावून चारा छावण्या सुरु करण्यास सांगितले जाईल असेही ते म्हणाले.

मंत्री शिवतारे यांनी पिंगळी बुद्रुक (ता. माण) येथे चारा छावणी पाहणी, पशुपालकांशी संवाद साधला. त्यानंतर प्रशासकीय अधिकारी व चारा छावणी चालकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, हरणाई सुत गिरणीचे संस्थापक रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ, रासपचे जिल्हाध्यक्ष मामूशेठ विरकर, भाजपचे रणधीर जाधव, शिवसेनेचे अनिल सुभेदार, रासपचे बबन विरकर, गोडसे, केशवराव वणवे, जिल्हा परिषद साताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. कैलास शिंदे, जिल्हा पशु संवर्धन उप आयुक्त डाॅ. अंकुश परिहार, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डाॅ. विनोद पवार, तहसिलदार बाई माने, तहसिलदार , गट विकास अधिकारी गोरख शेलार, गट विकास अधिकारी काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री शिवतारे म्हणाले जनावरांना प्रथम प्राधान्य द्या, इतर गोष्टींना दुय्यम. छावणी सुरु होणे ही शासनाची जबाबदारी आहे. जाचक अटी न ठेवता लवकर छावण्या कशा सुरु करता येथील ते पहा. जे चारा छावणी चालक चार दिवसात चारा छावणी सुरु करणार नाहीत त्यांची परवानगी काढून घेवून जे सध्या चारा छावणी चालवत आहेत त्यांना ती चारा छावणी चालविण्यास परवानगी द्या. छावणी सुरु केल्याच्या पहिल्या दिवसापासूनच अनुदान देण्यात येईल. जनावरांचा खर्च छावणी चालकांवर येणार नाही याची काळजी घेण्यात येईल. पाणी भरणा केंद्रावरुन छावणीतील जनावरांसाठी लागणारे पाणी देण्यात येईल. तसेच जिल्हाधिकारी मॅडमनी आदेश दिल्यानंतर छावणी सुरु करण्यासाठी प्रांताधिकार्यांनी उशीर केल्यास शो काॅज नोटीस काढण्यात येईल. जिल्हा बँक, मोठ्या पतसंस्था, साखर कारखाने यांना छावणी चालवण्यासाठी प्राधान्य देण्यासाठी यापुढे प्रयत्न करण्यात येईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I will answer to Chief Minister : Vijay Shivtare