Vidhansabha2019 : सातारा जावळीतून मीच उमेदवार - पवार

Vidhansabha2019 : सातारा जावळीतून मीच उमेदवार - पवार

सातारा : भाजपात आतापर्यंत तरी कोणीही आलेले नाही. आगामी काळात कोण येणार असेल तर पक्षाचे नेते आम्हांला विचारतील, त्यावेळी योग्य ते उत्तर आम्ही देऊ. गेली सहा वर्षे आम्ही साताऱ्याचा आमदार हटाव मोहिम चालविली आहे. सातारा-जावळी मतदारसंघात बुथनिहाय काम पाहता सातारा-जावळी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा मीच उमेदवार असेन असा ठाम विश्‍वास पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पवार यांनी आज (रविवार) येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 
पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्षपद मिळाल्यानंतर पवार यांनी साताऱ्यात प्रथमच पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले सातारा-जावळी मतदारसंघात बुथनिहाय केलेले काम पाहून पक्षाने मला हे पद दिले आहे. या पदाचा उपयोग सामान्य जनेतेसाठी तसेच पक्ष वाढीसाठी नक्की होईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या प्रश्‍नावर पवार म्हणाले सध्यातरी भाजपमध्ये येऊन सातारा- जावळी मतदारसंघात कोणी लुडबुड केलेली नाही. ज्यावेळी लुडबूड करतील त्यावेळी बघु. भाजपमध्ये यापुढे कोणी येणार असेल तर पक्षाचे नेते आम्हांला विचारतील त्यावेळी आम्ही योग्य ते उत्तर देऊ. गेली सहा वर्षे आम्ही आमदार हटाव मोहिम हाती घेतली आहे. विद्यमान आमदारांनी केलेले एक मोठे काम दाखवा. आम्ही चंद्रकांत दादांकडून विकास कामांसाठी मोठा निधी आणला आहे. यंदा देखील मीच सातारा जावळीतून विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार असणार आहे. गतवेळीस माझा 21 हजार 500 मतांनी पराभव झाला. आता ही निवडणुक जनतेनेच हातात घेतल्याने त्याची भरपाई होईल असा ठाम विश्‍वास पवार यांनी व्यक्त केला. 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com