सत्तेत आल्यावर पहिल्या आठवड्यात धनगर समाजाला आरक्षण देणार : पृथ्वीराज चव्हाण

हेमंत पवार
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

चार वर्षे झाले त्यावर काहीच निर्णय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला फवसले असुन त्यांच्याकडुन टोलवाटोलवीच सुरु असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी केला.

कऱ्हाड - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीला आंदोलनस्थळी जावुन धनगर समाजाला त्यांची सत्ता आल्यावर एका आठवड्यात पहिल्या कॅबीनेटमध्ये आरक्षण देतो अशी घोषणा केली. चार वर्षे झाले त्यावर काहीच निर्णय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठा, मुस्लिम, धनगर समाजाला फवसले असुन त्यांच्याकडुन टोलवाटोलवीच सुरु असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सोमवारी केला. कऱ्हाड (जि. सातारा) येथील आंदोलनस्थळी भेटीदरम्यान ते बोलत होते.

ते म्हणाले, आरक्षणाबाबत मी मराठा समाजाच्या सोबत आहे. मी काल कोल्हापुरलाही आंदोलनस्थळी भेट देवुन आलो. मराठा समाजातील तरुण आज आरक्षणासाठी आत्महत्या करताहेत हे वाईट आहे. सरकारने आता तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. सरकारने मराठा, मुस्लिम, धनगर समाजाच्या अरक्षणाबाबत लोकांची फसवणुकच केली आहे. सरकारने आवश्यक ती उपाययोजना न केल्यामुळे आरक्षणाचे भिजत घोंगडे अद्याप कायम आहे. मुख्यमंत्री बारामतीला आंदोलनस्थळी जावुन धनगर समाजाला त्यांची सत्ता आल्यावर एका आठवड्यात पहिल्या कॅबीनेटमध्ये आरक्षण देतो अशी घोषणा केली. चार वर्षे झाले त्यावर काहीच निर्णय नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून टोलवाटोलवीच सुरु आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: I will give reservation to Dhangar community in first week of coming to power says prithviraj chavhan