...तर मला आनंदच होईल - पृथ्वीराज चव्हाण

सचिन शिंदे
शुक्रवार, 11 मे 2018

माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना मिळाली. तर मला आनंदच होईल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 

कऱ्हाड - आगामी काळात विधानपरिषदेच्या सहा जागा रिक्त होताहेत. काँग्रेसतर्फे त्यातील एक जागा माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांना मिळाली. तर मला आनंदच होईल, असे मत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 

कऱ्हाडला आणखी एक आमदार मिळेल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. श्री. चव्हाण म्हणाले, विधान परिषदेवर कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय काँग्रेस पक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण घेतात. सध्या तेथे माणिकराव ठाकरे, संजय दत्त आणि शरद रणपिसे असे तिघेजण सदस्य आहेत. यातील कोणाला थांबवायचे, कोणाला संधी द्यायची, हा सर्वस्वी निर्णय पक्ष घेईल. कऱ्हाडात पृथ्वीराज चव्हाण व विलासराव पाटील-उंडाळकर गटाच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत विचारले त्यांनी उत्तर स्मित हास्य करत उत्तर देण्याचे टाळले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: I would be happy says Prithviraj Chavan