गुन्हा दाखल होऊनही संशयित मोकाट 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

इचलकरंजी - शहापूर (ता. हातकणंगले) येथील "आदर्श'मधील 3 कोटी 15 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणापाठोपाठ शुभम मागासवर्गीय औद्योगिक संस्थेत 88 लाख 57 हजार 643 रुपयांचा अपहार उघडकीस आला. लेखापरीक्षकांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होऊनही संबंधित 34 संशयित आरोपी उजळमाथ्याने फिरत आहेत. 

इचलकरंजी - शहापूर (ता. हातकणंगले) येथील "आदर्श'मधील 3 कोटी 15 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणापाठोपाठ शुभम मागासवर्गीय औद्योगिक संस्थेत 88 लाख 57 हजार 643 रुपयांचा अपहार उघडकीस आला. लेखापरीक्षकांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल होऊनही संबंधित 34 संशयित आरोपी उजळमाथ्याने फिरत आहेत. 

आदर्श मागासवर्गीय सहकारी संस्थेचे संस्थापक उपाध्यक्ष लक्ष्मण भिवा कांबळे, संचालक सुभाष तुकाराम कांबळे, उमेश रमेश कांबळे, संजय आनंदा कोठावळे, बाळू रामचंद्र कांबळे, अरुण बाळकृष्ण कांबळे, सुभाष महादेव कांबळे, अविनाश सुदाम कांबळे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाईमाने यांची नातेवाईक संचालिका सीता दत्तात्रय भाईमाने, सुलक्षणा दीपक कांबळे, श्रीकांत भीमराव कांबळे, महादेव सदाशिव गेजगे, अंकुश ज्ञानदेव कांबळे, महावीर हरीबा साठे, किसन शिवा साठे, कालिदास सोमनाथ बनसोडे, सोनाली नागोजी कांबळे, प्रकाश लहू गायकवाड, सुनील मारुती साठे, फैयाज गफूर कलावंत, सुशीला अशोक कांबळे, प्रकाश शिवाजी तडाखे, नेताजी नागोजी कांबळे, सुनील शामराव कलावंत, शशिकांत राजाराम मधाळे, प्रकाश महादेव माने, अमर नारायण शिंदे, अमर सुधाकर लोकरे, विजय दशरथ कांबळे, लालबहादूर दशरथ कांबळे यांच्यासह येथील शुभम मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमर नानासो पारडे, सचिव लक्ष्मण अर्जुन काळे व जे. एम. लाईट हाऊस या फर्मचा मालक (पूर्ण नाव समजू शकले नाही) यांचा समावेश आहे. 

आदर्श मागासवर्गीय सहकारी संस्थेत 3 कोटी 15 लाख 2 हजार 647 रुपयांचा तर शुभम मागासवर्गीय औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये सुमारे 88 लाख 57 हजार 643 रुपयांचा अपहार झाल्याचे संस्थेच्या लेखापरीक्षणामध्ये उघड झाले आहे. "आदर्श'मधील अपहाराचा शहापूर पोलिसांत तर "शुभम'मधील अपहाराचा गुन्हा शिवाजीनगर पोलिसात दाखल झाला आहे.

Web Title: ichalkaranji news crime

टॅग्स