केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये इचलकरंजी ७६ वा क्रमांक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paschim maharashtra

केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये इचलकरंजी ७६ वा क्रमांक

इचलकरंजी : केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये इचलकरंजी शहरात देशात ७६ वा क्रमांक आला. तर राज्यात दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी पेक्षा यंदा मानांकनात चांगली सुधारणा झाली आहे. यामुळे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रभावी कामगिरीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशनतर्फे दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवले जाते. यामध्ये यावर्षी इचलकरंजी शहराने उत्तम कामगिरी करून देश पातळीवर ७६ वा क्रमांक (३७२ पैकी) तर राज्य पातळीवर दुसऱ्या क्रमांक (१३ पैकी) पटकविला आहे. गेल्या वर्षी इचलकरंजी शहर देशपातळीवर ८९ व्या क्रमांकावर तर राज्य पातळीवर तत्कालीन मानांकनानुसार २५ व्या क्रमांकावर होते. इचलकरंजी शहर हे १ ते १० लाख लोकसंख्याच्ये गटामध्ये गणले जाते. स्वच्छतेच्या या स्पर्धेमध्ये शहरातील घनकचऱ्याचे व्यवस्थापन, सांडपाण्याचे व्यवस्थापन, नागरिकांचे स्वच्छतेच्या बाबतीत जनजगरण व सहभाग अशा विविध क्षेत्रातील कामांचे परीक्षण करण्यात आले. हे परीक्षण केंद्र शासनकृत त्रयस्थ संस्थेकडून करण्यात आले.

हेही वाचा: आर्टिकल 15 : अब फर्क लाऐंगे...(चित्रपट परीक्षण)

दरम्यान इचलकरंजी शहरास ओपन डेफिकेशन फ्री प्लस प्लस (ओडीएफ डबल प्लस) प्रमाणित करण्यात आल्यामुळे शहराच्या एकूण मानांकनावर चांगला परिणाम झाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण मधील या कामगिरीसाठी शहरच्या नगराध्यक्षा मअॅड. सौ. अलका स्वामी, उप-नगराध्यक्ष तानाजी पावार, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक पाटील, संतोष खांडेकर, शरद पाटील, विद्यमान मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, उप मुख्य अधिकारी केतन गुजर, तत्कालीन आरोग्य सभापती सौ. गीता भोसले, विद्यमान आरोग्य सभापती संजय केंगार, शहर स्वच्छता विभाग प्रमुख विश्वास हेगडे, स्वच्छ सर्वेक्षणचे शहर समन्वयक अधिकारी प्रविण बोंगाळे, तत्कालीन मुख्य स्वच्छता निरीक्षक विजय पाटील व मुख्य स्वच्छता निरीक्षक सूर्यकांत चव्हाण, सर्व स्वच्छता निरीक्षक, सर्व प्रभाग निरीक्षक व आरोग्य विभागाकडील सफाई कर्मचारी, सर्व विभाग प्रमुख, सर्व नगरसेवक व स्वयंसेवी संस्थांचे विशेष योगदान व मार्गदर्शन लाभले. पुढील स्वच्छ सर्वेक्षण मध्ये याहून उत्तम कामगिरी करण्याचा मानस आहे.

- डॉ. सुनिलदत्त संगेवार आरोग्य अधिकारी

loading image
go to top