इचलकरंजीत दोन पिस्तूल जप्त

पंडित कोंडेकर
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

इचलकरंजी - येथील शहापूर पोलिसांनी नाकाबंदीवेळी दोन संशयितांना पकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल व १२ जिवंत काडतूसे जप्त केली. त्याची किमत दीड लाख रुपये इतकी आहे. विजयकुमार उर्फ अक्षय शंकर पाटील वय २३ रा. डफळापूर,ता. जत व सतिश शिवाजी कोळी वय २७ रा. घाटनांद्रे, कवठेमहांकाळ यांना अटक केली अाहे.

इचलकरंजी - येथील शहापूर पोलिसांनी नाकाबंदीवेळी दोन संशयितांना पकडून दोन देशी बनावटीची पिस्तूल व १२ जिवंत काडतूसे जप्त केली. त्याची किमत दीड लाख रुपये इतकी आहे. विजयकुमार उर्फ अक्षय शंकर पाटील वय २३ रा. डफळापूर, ता. जत व सतिश शिवाजी कोळी वय २७ रा. घाटनांद्रे, कवठेमहांकाळ अशी अटक केलेल्यांती नावे अाहेत. याबाबतची माहिती अप्पर पोलीस अधिक्षक श्रीनिवास घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोन्ही संशयीत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर पिस्तूल विक्रीचे सांगली शहर व कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात यापूर्वी गुन्हे नोंद आहेत. या शिवाय दरोडा, दरोड्याचे प्रयत्न या सारखे गुन्हे नोंद आहेत. काल रात्री ८ वाजता यड्राव फाटा येथे ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून एक मोटर सायकल ही जप्त करण्यात आली आहे. पिस्तूलांची  विक्री करण्याच्या उद्देशाने ते फिरत असतांना त्यांना पकडण्यात पोलिसांना यश आल्याचे श्री. घाडगे यांनी सांगितले. यावेळी पोलीस उप अधिक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय हारुगडे उपस्थित होते. 

कारवाईत पोलीस उप निरीक्षक मनोज कावडे, राजेंद्र यादव, रियाज मुजावर, सहाय्यक फौजदार तानाजी गुरव, कमलसिंग राजपूत, सुरेश कोरवी आदींनी भाग घेतला.

Web Title: in Ichalkaranji two pistols seized