आमदार परिचारकांच्या निषेधार्थ कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून नोंदवला सहभाग
पंढरपूर - आमदार प्रशांत परिचारकांनी सैनिकांच्या कुटुंबीयांच्या संदर्भात केलेल्या बेताल व अक्षम्य वक्तव्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी आयोजित पंढरपूर बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व भागांतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. आजचा बंद शांततेत पार पडला. दिवसभरात शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आजच्या पंढरपूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, संभाजी ब्रिगेड, माजी सैनिक संघटना यांसह विविध संघटनांनी आजच्या बंदला पाठिंबा दिला होता. त्यामुळे सकाळपासून श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर परिसर, नवी पेठ, स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग आदी प्रमुख भागांतील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. या वेळी विविध संघटनेच्या वतीने प्रशांत परिचारक यांच्याविरुद्ध मोर्चा काढण्यात आला. स्टेशन रोड, सावरकर पुतळा, बसस्थानक, अर्बन बॅंक, भादुले पुतळा, नाथ चौकमार्गे पुन्हा मोर्चा शिवाजी चौकात आला. तिथे तहसीलदार अनिल कारंडे हे निवेदन स्वीकारण्यासाठी आले होते. त्यांना निवेदन देण्यात आले. मोर्चेकऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

परिचारकांच्या वाड्याबाहेर बंदोबस्त
दरम्यान, आजच्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर दक्षता म्हणून शहरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विशेषतः परिचारक यांच्या वाड्याबाहेर तसेच पंढरपूर अर्बन बॅंकेजवळ पोलिस तैनात करण्यात आले होते. आजचा बंद शांततेत पार पडला. कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

Web Title: Ichthyosis off the protest MLA paricharak