शाहु फुले आंबेडकरांचे विचार घराघरात पोचविले पाहिजेत : रमेश बारसकर

राजकुमार शहा 
रविवार, 1 जुलै 2018

मोहोळ : ''आगामी काळात पदाधिकाऱ्यांनी शाहु फुले आंबेडकरांचे विचार घराघरात पोचविले पाहिजेत. समाजातील अंधश्रद्वा संपविण्यासाठीच ज्योती क्रांती परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. मंडल आयोगामुळे आरक्षणाचा निर्णय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी घेतला. भविष्यात न्याय हक्कासाठी अल्पसंख्याक समाजाला एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल.'' ,असे प्रतिपादन ज्योती क्रांती परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी केले 

मोहोळ येथे परिषदेच्या नवीन कार्यकारीणीच्या निवडी व मेळावा आयोजित केला होता त्यावेळी बारसकर बोलत होते. यावेळी माळशिरस पंढरपूर उतर सोलापूर आदीसह अन्य तालुक्यातील कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार हिवरकर म्हणाले सध्या ओबीसीना संपविण्याचे काम सुरू आहे. सर्वानी संघटीत होऊन लढा दिला पाहीजे. जमात शासन कर्ती झाली पाहिजे जिल्हा परिषद सदस्य अरुण तोडकर म्हणाले. परिषदेच्या गावागावात शाखा काढुन सर्व सामान्याचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. बारसकर यांनी आता राज्याचे नेतृत्व करावे. त्यांच्या माध्यमातुन ओबीसीना खंबीर नेतृत्व मिळाले आहे.

नूतन कार्यकारणी पुढील प्रमाणे 
राजकुमार हिवरकर - प्रदेश उपाध्यक्ष
लतिफ तांबोळी - प्रदेश सरचिटणीस
अतुल क्षिरसागर - पश्चिम महाराष्ट्र कार्यध्यक्ष
शिलवंत क्षिरसागर - प्रदेश प्रवक्ता
फरिद इनामदार - निरिक्षक सोशल मिडीया
संजय दुधाळ - जिल्हाध्यक्ष सोलापूर
अरविंद राऊत - जिल्हाउपाध्यक्ष
अमोल माळी - जिल्हाउपाध्यक्ष
अमोल माळी - सरचिटणीस
बलभिम भानवसे - तालुका अध्यक्ष मोहोळ
सिध्देश्वर जाधव - तालुका उपाध्यक्ष मोहोळ
सोमनाथ भालेराव - मोहोळ शहराध्यक्ष 
ओम स्वामी - कार्याध्यक्ष मोहोळ
सागर यादव - माळशिरस ता अध्यक्ष
शुक्राचार्य गवळी - पंढरपूर ता अध्यक्ष
सागर अष्टुळ - सोलापूर जि कार्याध्यक्ष युवक आघाडी
शुभम उंबरे - शहराध्यक्ष विद्यार्थी आघाडी
आकाश माळी - शहरउपाध्यक्ष

Web Title: The idea of Shahu Phule Ambedkar should be reached in the house: Ramesh Baraskar