ठोस उपाय योजना केल्यास राज्याचा दुध धंदा उर्जित होईल - गुलाब डेरे 

सनी सोनावळे
बुधवार, 6 जून 2018

टाकळी ढोकेश्वर - सध्याचे दुध स्वीकृतीचे फॅट व एसएनएफ चे निकष रद्द करून नविन निकष फॅट व प्रोटीन्सवर दुध स्विकृती केल्यास राज्यातील दुध भेसळ पुर्णपणे थांबेल यासंह अन्य दुधदरवाढीविषयी उपायोजनेंबाबत दुध उत्पादक कल्याणकारी संघाचे अध्यक्ष गुलाब डेरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला आहे.

त्यात म्हणले आहे की,राज्यातील दुध धंदा पुर्णपणे मोडकळीस आलेला आहे शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळत नाही दुध व्यवसाय नष्ट होण्याच्या मार्गावर त्यामुळे त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

टोन्ड दुध बंद करण्याची आवश्यकता आहे टोन्ड अनैसर्गिक आहे या अशा दुधामुळे 50% दुधाचे ग्राहक कमी झाले आहेत दुध पोषक नसल्यामुळे ग्राहक त्याचा आहारामध्ये उपयोग करत नाहीत त्यासाठी गायीचे दुध हा एकच ब्रँड ठेवला पाहीजे.

दुध भेसळ प्रतिबंधक उपाय योजना होणे गरजेचे आहे चांगल्या प्रतिचे दुध मिळवण्यासाठी व लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी चांगल्या दुधाची आवश्यकता असते पंरतु पावलोपावली होणारी भेसळ व कमी प्रतिचे दुध आरोग्यास हानिकारक आहे यामुळे दुधाची अतिरिक्त वाढ होऊन दुधाचा महापूर आलेला आहे यासाठी शासन प्रतिनिधी, महानगरपालिका दुग्ध- विकास मंडळ, पोलीस अन्न सुरक्षा पथक,पत्रकार यांची संयुक्त भरारी पथके तयार करण्यात यावी.गावागावात खाजगी संस्था घरोघरी जाऊन दुध संकलन करीत आहेत त्यामुळे फॅट/डिग्री न पाहता दुध संकलन केले जाते व मानेल तसा भाव या संस्था शेतकऱ्यांना देतात त्यांची पुर्णपणे लूट केली जात आहे दुध संकलन केंद्रावरच संकलित करणे  गरजेचे आहे.3.6 ते 5.0 प्रति पोइंट वाढीव फॅटसाठी 30 पैसे ऐवजी 45 पैसे इतकी वाढ करण्यात यावी.राज्यात अतिरिक्त दुध असताना गुजरातमधुन 18 लाख तर कर्नाटक मधुन 5 लाख लिटर दुध दररोज महाराष्ट्रात येते त्याचाही दुध दररोज महाराष्ट्रात येते त्याचाही दुध दरावर परिणाम होते त्यामुळे या बाहेरील येणाऱ्या दुधावर 3 रूपये प्रतिलिटर कर लावणे गरजेचे तरच या दुधाला चाप बसेल.

Web Title: If the concrete solution is planned, the state's milk business will be emancipated - Gulab Dere