ग्राहक जागरूक झाला तरच फसवणूक थांबेल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मार्च 2017

सांगली - सामान्य माणसाची वेगवेगळ्या माध्यमातून फसवणूक होत असते. जीवनात सर्व क्षेत्रांतील फसवणूक थांबवायची असेल तर ग्राहकाने जागरूक व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आणि जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांनी आज येथे केले. 

येथील श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महिला महाविद्यालयात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि पुरवठा विभागाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. 

ते म्हणाले, ""आपण प्रत्येक जण ग्राहक आहोत. प्रत्येक जण एकदा तरी आयुष्यात फसला गेला आहे. फसवणूक करणारे लोक रोज नवनव्या कल्पना आणतात. याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. ग्राहकाने आपण स्वतःची फसवणूक करून घेणार नाही, हा मंत्र अंमलात आणण्याची गरज आहे.'' 

कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी मिनाज मुल्ला, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी तेजस्विनी पाटील, मोटार वाहन निरीक्षक अरविंद देसाई, अन्न धान्य वितरण अधिकारी अर्चना कापसे, डॉ. मनोजकुमार पाटील, श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. पवार, ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य भास्करराव मोहिते, डॉ. जयश्री पाटील, मोहन जगताप, मिलिंद सुतार, आलमशहा मोमीन, संजय कोरे, के. आर. देशपांडे, एजीएम बीएसएनएल श्री. कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी जेनरिक औषधांबाबत डॉ. मनोजकुमार पाटील, ड्रायव्हिंग लायसन्सबाबत अरविंद देसाई, स्त्री शक्तीची उत्तुंग भरारी व स्त्री भ्रूणहत्या या विषयावर डॉ. जयश्री पाटील यांनी विचार व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. पी. आर. पवार यांनी केले. स्वागत अन्न धान्य वितरण अधिकारी अर्चना कापसे यांनी केले. सूत्रसंचालन बिपीन कदम यांनी केले. 

या वेळी ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

Web Title: If the customer was aware of the fraud stops

टॅग्स