चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेवून बांधा- राम शिंदे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन बांधा, असा अजब सल्ला राज्याचे जलसंधारण मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. यामुळे सोशल मिडीयावर संताप व्यक्त होत आहे. राम शिंदे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

नगर- चारा नसेल तर जनावरे पाहुण्यांकडे नेऊन बांधा, असा अजब सल्ला राज्याचे जलसंधारण मंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. यामुळे सोशल मिडीयावर संताप व्यक्त होत आहे. राम शिंदे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून शेतकऱ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राम शिंदे हे पाथर्डी येथे आले होते. त्यावेळी एक शेतकरी शिंदे यांना भेटायला आला व दुष्काळी स्थितीमुळे चारा उपलब्ध नाही. त्यामुळे जनावरांची चाऱ्या अभावी उपासमार होत असल्याचे शेतकरी मंत्री शिंदे यांना सांगत होता. यावर त्या शेतकऱ्याला सल्ला देताना राम शिंदे यांनी त्या शेतकऱ्याला चारा नसेल तर आपली जनावरे पाहुण्याकडे नेऊन बांधा, असा अजब सल्ला त्यांनी दिला.

दरम्यान, या वक्तव्यानंतर मंत्री राम शिंदे यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत असताना शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांनीही राम शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तसेच राम शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे सांगितले आहे.

Web Title: If There Is No Fodder Leave The Animal To The Guest Minister Ram Shindes Advice To The Farmer