वाहनाचा विमा नसेल तर सावधान, दंडात्मक कारवाई सुरू

वाहनाचा विमा नसेल तर सावधान, दंडात्मक कारवाई सुरू

माढा - वाहन चालवताना सिट बेल्ट लावला नसेल, अथवा दुचाकीवरून जात असाल तर हेल्मेट, गाडी चालवण्याचा परवाना नसेल अथवा मोबाईलवर बोलत गाडी चालवत असाल तर सावधान. अश्या वाहनधारकांवर कारवाई करण्याची मोहिम जिल्ह्यात वाहतुक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरू केली असुन, माढा पोलिस ठाण्याच्या समोर देखील वाहतुक शाखेच्या पोलिसांनी गेल्या ५ दिवसात वाहतूकीचे नियम न पाळणाऱया १०० हून अधिक वाहनांवर कारवाई केल्या आहेत.

न्यायालयाच्या आदेशानुसार वाहनांचा विमा परवाना नसलेल्या चालकावर ३०० रूपये व मालकावर २००० रूपये एवढा दंड करून विमा परवाना काढेपर्यंत गाडी सोडणार नाहीत. माढा शहरात आत्तापर्यंत अश्या ५ वाहनधारकांवर कारवाई करत ११ हजार ५०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर वाहतूकीचे नियम मोडून मोबाईलवर बोलत गाडी चालवणार्यां ५ वाहनचालकांचे वाहन चालवण्याचा परवाना निलंबित करण्यात आले आहेत. तर हेल्मेट न घातलेल्या १५ वाहनधारकांकडुन प्रत्येकी ५०० रूपये तर सिटबेल्ट न लावलेल्या ३० वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सुचनेनुसार व पोलिस निरीक्षक दिपक लुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुक पोलिस शिवाजी सावंत यांनी वाहतुकीच्या नियम पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी वाहन चालवताना सर्व कागपत्रांची पुर्तता करत वाहतुकीच्या नियमाचे पालन करत वाहने चालवावीत. या कारवाईमुळे माढा परिसरातील वाहनधारकांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे समोर पोलीस दिसताच पर्यायी गल्लीबोळातून वाट काढताना वाहनचालक दिसत आहेत. 

या वाहनांवर होणार कारवाई 
-  ब्लॅक काच, ट्रिपल सीट, गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे, लायसन्स नसणे, धोकादायक रित्या वाहन चालविणे, नंबर प्लेट नसणे, फॅन्सी नंबर प्लेट, विदाउट हेल्मेट, लायसन्स जवळ न बाळगणे, ओपन फाळका, पोलीसांचा ईशारा न मानणे, नो पार्किंग, सीटबेल्ट न लावणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, रहदारीस अडथळा अश्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com