ठरवलं तर 25 कोटींचं बक्षीस आपलंच! 

if you decide a reward of 25 crores
if you decide a reward of 25 crores

नगर: स्वच्छ भारत अभियानात केंद्रीय पथकांची सध्या शहरात स्वच्छतेबाबत "झाडाझडती' सुरू आहे. वस्तुस्थितीच्या पडताळणीसाठी पथकाकडून नागरिकांशी संवादही साधला जाणार आहे. नगरवासीयांची कसोटी पणाला लागणार आहे. सकारात्मकतेने नागरिकांनी कृतिशील जबाबदारी पार पाडल्यास 25 कोटी रुपयांच्या धनराशीसह नगर शहराचा सन्मान होणेही शक्‍य आहे.

मिळणारा कोट्यवधींचा निधी शहरातील नागरिकांच्याच सोयी-सुविधांसाठी खर्च होईल. त्यामुळे सदासर्वदा यंत्रणेच्या नावाने शिमगा करण्याची सवय सोडून जबाबदारी स्वीकारीत स्वच्छतेच्या अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. 

पाचवे वर्ष 
स्वच्छता अभियानाचे यंदा पाचवे वर्ष आहे. आता पाचव्या वर्षातील स्वच्छ सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत जिल्हाभर होणार आहे. यासाठी दोन पथके शहरात दाखल झाली आहेत. "थ्री स्टार'साठीचे पथक कोणत्याही क्षणी धडकणार आहे. स्वच्छतेबाबत नगरवासीयांची परीक्षा सुरू आहे. त्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात येत आहे. निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे योग्य पद्धतीने संकलन व विल्हेवाट करण्याची जबाबदारी जशी स्थानिक प्रशासनाची आहे, तसाच नागरिकांचाही सहयोग आवश्‍यक आहे. 

दीड हजार जणांचा फौजफाटा तयार 
या मोहिमेत प्रथम 25, द्वितीय 15, तृतीय दहा कोटींचे बक्षीस आहे. याच पार्श्‍वभूमीवर महापालिकेची सर्व यंत्रणा शहरात स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर राबवीत आहे. यासाठी दीड हजार जणांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे कुठेही कचरा टाकणे बंद करून कचरा गाडीतच टाकण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. 


स्वच्छतेची मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. याचा परिणाम म्हणून शहरात चांगलाच बदल दिसून येत आहे. स्वच्छता ही नगर शहराची, जिल्ह्याची संस्कृती आहे. तिचा सन्मान राखण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढण्याची गरज आहे, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com