न्यूझीलंडला यायचंय तर 10 लाख रुपये आण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

- नणंदेसह सासूकडून विवाहितेचा छळ 
- अंगावरील दागिने घेऊन दिले घरातून हाकलून 
- विवाहावेळी काहीच खर्च केला नसल्याचे म्हणणे

सोलापूर : सोलापुरातील प्रियांका यांचा मुंबईतील संकेत शेलार याच्याशी पाच महिन्यांपूर्वी (23 मे 2019) विवाह झाला होता. संकेत हा न्यूझीलंड (ऑकलंड) येथील हॉटेल हार्टलॅंड फक्‍स ग्लेशर येथे सिनिअर शेफ म्हणून नोकरीस आहे. विवाहानंतर 3 जुलैला संकेत न्यूझीलंडला परतला. त्यानंतर लगेचच नणंद, तिचा पती व सासूकडून प्रियांकाचा छळ सुरू झाला. तुला न्यूझीलंडला यायचे असेल तर माहेरून 10 लाख रुपये घेऊन ये, म्हणत तिच्या अंगावरील दागिने काढून घराबाहेर काढल्याची घटना समोर आली आहे.

नकार देताच गळा दाबून प्रियेसीचा खून

पती परदेशात नोकरीला असल्याने आपला संसार सुखाचा होईल, असे स्वप्न उराशी बाळगून प्रियांका यांनी संकेत याच्याशी विवाह केला. प्रियांका यांच्या आई-वडिलांनी हिंदू रितिरिवाजानुसार संकेत याच्या ईस्ट मुंबईतील घरी विवाह लावून दिला. मात्र, विवाहानंतर अवघ्या पाच महिन्यांतच सासरच्या लोकांची खरी मानसिकता समोर आली. तुझ्या आई-वडिलांनी विवाहावेळी काहीच खर्च केला नाही, विवाहाचा निम्मा पाच लाखांचा खर्च माहेरून घेऊन ये, असा तगादा लावत घरातील वस्तू फेकून मारल्या. न्यूझीलंडला पतीकडे यायचे असल्यास 10 लाख रुपये आण, असे म्हणत शिवीगाळ व मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले. सासरकडील मंडळींच्या त्रासाला कंटाळून प्रियांका यांनी सोलापुरातील विजापूर नाका पोलिसांत नणंद प्रियांका उमेश शिंदे व तिचा पती उमेश शिंदे, नवरा संकेत शेलार व सासू सुमित्रा विष्णू शेलार यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.

'हे' आहेत मॉर्निंग वॉकचे फायदे 

तुझ्या वडिलांनी तुला विकले आहे... 
तुझे वडील भिकारी आहेत. त्यांनी तुला विकले असून, आमच्या मुलाशी विवाह करण्याची तुझी लायकी नाही, असेही म्हणत प्रियांका यांचा छळ केला. सासरी छळ होत असल्याने प्रियांका सध्या सोलापुरातील मनमित ब्लॉसम अपार्टमेंटमध्ये राहात आहेत. सासरच्यांनी माझा मानसिक व शारीरिक छळ केल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक टंकसाळी पुढील तपास करीत आहेत.

खराब रस्त्यांसाठी देवालाच साकडे 

दारू पिऊन पतीची घरात घुसून पत्नीला मारहाण 
कौटुंबिक कारणावरून पती दारू पिऊन वारंवार त्रास देत असल्याने अफसाना अन्वर शेख (रा. काडादी चाळ, सोलापूर) या पाच महिन्यांपासून माहेरी राहण्यास आहेत. सासरच्या त्रासाला कंटाळून माहेरी राहण्यास आलेल्या अफसाना यांना पती अन्वर अल्लाबक्ष शेख, दीर इरफान शेख, नणंदेचा मुलगा आरिफ शेख या तिघांनी घरात घुसून लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या घटनेची फिर्याद अफसाना यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: If you want to come to New Zealand, bring Rs 10 lakh