शेतकरी, संस्थांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म 

IFFCO's Golden Jubilee
IFFCO's Golden Jubilee

कोल्हापूर - इफ्कोने शेतकरी व संलग्नित संस्थांसाठी सातत्याने वेगळे उपक्रम राबवले आहेत. येथून पुढील काळात या सर्वांना एकत्रित आणून सुसंवाद साधण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, अशी माहिती इफ्कोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी यांनी दिली. इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को ऑपरेटिव्ह लिमिटेड (इफ्को) च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आज येथे आयोजित शेतकरी व सहकारी संस्था प्रतिनिधींच्या मेळाव्यात डॉ. अवस्थी बोलत होते. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील अध्यक्षस्थानी होते. 

डॉ. अवस्थी म्हणाले, ""इफ्को ही तळागाळात रुजलेली संस्था आहे. शेतकरी व सहकारी संस्थांच्या प्रतिसादाच्या जोरावर इफ्कोने देशात अग्रेसर होण्याचा मान मिळवला आहे. हा संवादाचा पूल बळकट होण्याकरिता इफ्को यापुढील काळातही प्रयत्न करेल. यासाठी सर्वांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर जोडणार आहोत. व्यापाराची माहिती, रोड ब्लॉग्स, राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय खते व दराची माहिती यात असेल. फोन हा यातील महत्त्वाचा घटक असेल. या माध्यमातून इफ्को संपर्क साधेल. संस्थेने सर्व घटक एकाच ठिकाणी मिळण्यासाठी इफ्को ई-बाजार सुरू केला आहे. ही केंद्रे संस्थांनी चालवावीत. वीस टक्के लाभांश यापुढेही संस्थांना देण्यात येईल.'' 

श्री. पाटील म्हणाले, ""हायड्रोपोनिक चाऱ्यासारखा प्रकल्प इफ्कोच्या सहाय्याने राबवण्यासाठी "गोकुळ'चे सहकार्य राहील.'' 

मुख्य विभागीय व्यवस्थापक डी. बी. भोर यांनी प्रास्ताविक केले. राज्य वितरण व्यस्थापक एस. के. घाडगे, बी. डी. पवार, विजय पाटील, हिरोशी यासूद, सरव्यवस्थापक योगेंद्र कुमार, संदीप नरके यांच्यासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकरी व विविध संस्थांचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com