भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने इफ्तार पार्टी

प्रा. प्रशांत चवरे
शनिवार, 9 जून 2018

भिगवण - राज्यातील मुस्लिम समाजाची स्थिती विचारात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे माध्यमातून मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षणाचा निर्णय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी शासनाने घेतला होता. विदयमान शासनाने मुस्लिम आरक्षण रद्द केल्यामुळे अडचणी आहेत. मुस्लिम समाजाच्या आरक्षणासह सर्वच प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कटीबध्द आहे असे प्रतिपादन इंदापुरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.

येथील भिगवण ग्रामपंचायत व राष्ट्रवादी काँग्रेस यांचे संयुक्त विदयमाने जामा मस्जिद येथे इफ्तार पाटीर्चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, राष्ट्रीवादी व्यापार उद्योग विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अॅंड. महेश देवकाते, तालुका उपाध्यक्ष धनाजी थोरात, शंकरराव गायकवाड, अजिंक्य माडगे, उपसरपंच जयदीप जाधव, शहर अध्यक्ष सचिन बोगावत, युवक अध्यक्ष अमोल देवकाते, सुरेश बिबे, प्रदीप वाकसे, दत्तात्रय पाचांगणे, प्रशांत शेलार, विष्णुपंत देवकाते उपस्थित होते. आमदार भरणे पुढे म्हणाले, इंदापुर तालुक्यामध्ये धामिर्क सलोखा आदशर्वत आहे. समाजकंटकाकडुन काहीवेळा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो अशावेळी सजग राहण्याची आवश्यकता आहे. येथील जामा मस्जिदीमध्ये मुस्लिम बांधवाच्या विवाह कार्यासाठी बांधण्यात येणाऱ्या सभामंडपास आमदार फंडातुन बारा लाख रुपये देण्यात आले आहेत यापुढे अशा कामांसाठी निधी कमी पडु देणार नाही. 

यावेळी सचिन बोगावत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सिराज शेख यांनी केले सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन रियाज शेख यांनी केले. इफ्तार पार्टीसाठी भिगवण व परिसरातील मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Web Title: Iftar Party on behalf of Bhigavana Gram Panchayat