विद्युत मंडळाच्या दुर्लक्षाने घोळसगाव पाच दिवसापासून अंधारात

राजशेखर चौधरी
बुधवार, 6 जून 2018

अक्कलकोट - महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अक्कलकोट कार्यालयाच्या दुर्लक्षाने घोळसगाव ता.अक्कलकोट येथील वीज रोहित्र (डेपो)जळाले असून, पाच दिवसापासून संपूर्ण गाव अंधारात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिरवळ उपविभाग अंतर्गत येणाऱ्या घोळसगावचा वीज पुरवठा मागील शुक्रवार ता. १ जूनपासून रोहित्र (डेपो ) जळाल्याने गाव अंधारात आहे. यामुळे शेतकरी, कष्टकरी, लहान मुले, गावातील दळणवळण या सर्व बाबींचा गावकऱ्यांना त्रास होत आहे. वीज मंडळाच्या अक्कलकोट कार्यलयाला वारंवार तक्रार करूनही दाद दिली जात नाही.सध्या उन्हाची प्रचंड धग त्यामुळे पाणी पातळी कमी झाली आहे.

अक्कलकोट - महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अक्कलकोट कार्यालयाच्या दुर्लक्षाने घोळसगाव ता.अक्कलकोट येथील वीज रोहित्र (डेपो)जळाले असून, पाच दिवसापासून संपूर्ण गाव अंधारात असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शिरवळ उपविभाग अंतर्गत येणाऱ्या घोळसगावचा वीज पुरवठा मागील शुक्रवार ता. १ जूनपासून रोहित्र (डेपो ) जळाल्याने गाव अंधारात आहे. यामुळे शेतकरी, कष्टकरी, लहान मुले, गावातील दळणवळण या सर्व बाबींचा गावकऱ्यांना त्रास होत आहे. वीज मंडळाच्या अक्कलकोट कार्यलयाला वारंवार तक्रार करूनही दाद दिली जात नाही.सध्या उन्हाची प्रचंड धग त्यामुळे पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पिके वाळत आहेत.इतके दिवस मंडळाचे लोडशेडिंगमुळे नागरिक त्रस्त तर आता विजेचा डेपो जळूनही अधिकारांचे निर्लक्ष यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.संपर्क केल्यास फोनच उचलत नाहीत.आणि या ग्रामीण भागाच्या समस्येकडे दाद देत नाहीत. त्यामुळे गावकऱ्यातुन संताप व्यक्त होत आहे.गावातील गरीब लोकांना दररोज दळण करावे लागते पण गिरण्या बंद आहेत.मोबाईल चार्ज करावे तर वीजपुरवठा बंद त्यामुळे लांब वस्तीवर जाऊन चार्ज करावा लागत आहे.याबाबीचा विचार करून सोलापूर येथील वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.

वीज मंडळाच्या या गलथान कारभारामुळे अनेक वेळा ग्रामस्थांना या वीज समस्येचा सामना करावा लागतो आहे.पाच दिवस या आधुनिकीकरणाच्या काळात वीज गावात नाही याची नुसती कल्पना सुद्धा करवत नाही. नागरिक कसे या परिस्थितीला तोंड द्यावे हेच कळत नाही.
गुरुसिद्ध हपाळे, ग्रामस्थ घोळसगाव

Web Title: ignorance of the Electricity Board, Ghosasgaon is in dark in five days