‘आयआयटी-जेईई’ परीक्षा - तंत्र व प्रभुत्व

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

कोल्हापूर - विद्यार्थ्यांना आयआयटी-जेईईची परीक्षा ही अवघड वाटते. अवघड वाटणारा हा जेईईचा अभ्यास स्मार्ट व अचूक पद्धतीने कसा करता येईल, यासाठी ‘सकाळ विद्या’ व ‘देवधर्स ॲकॅडमी ऑफ एक्‍सलन्स’ (डीएई) तर्फे विशेष चर्चासत्र आयोजिले आहे. शनिवारी (ता. २२) हे चर्चासत्र कोल्हापूरमधील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन, दसरा चौक येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.

बऱ्याचदा पात्रता असूनही केवळ योग्य मार्गदर्शनाचा अभाव, चुकीचे अभ्यासतंत्र व नियोजन यामुळे वर्षभर अभ्यास करूनही विद्यार्थी मागे पडतात. यानुसार अभ्यासाचे योग्य तंत्र व योग्य गुरूचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. कोणत्याही अभ्यासप्रक्रियेला सुरवात करताना साधारणपणे तयारी केव्हापासून करायची, कशी करायची यासारखे अनेक प्रश्‍न विद्यार्थ्याला भेडसावत असतात. विद्यार्थ्याला विषयातील मूलभूत संकल्पना स्पष्ट असतील, तरच अवघड अभ्यास सोपा होतो आणि म्हणूनच अवघड वाटणाऱ्या जेईईसारख्या परीक्षांवर प्रभुत्व मिळविता येणे शक्‍य होते. अवघड वाटणारा हा जेईईचा अभ्यास स्मार्ट पद्धतीने कसा करता येईल, यासाठी ‘देवधर क्‍लासेस’ने हाती घेतलेल्या ‘देवधर्स ॲकॅडमी ऑफ एक्‍सलन्स’ (डीएई) या उपक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे. याच उद्देशाने ‘सकाळ विद्या’ आणि ‘डीएई’ने विशेष चर्चासत्राचे आयोजन केले आहे. 

या चर्चासत्रात प्रा. संदीप देवधर (संस्थापक, देवधर क्‍लासेस, पुणे) आणि प्रा. केदार रिसबूड (ॲकॅडमिक हेड, डीएई) हे मार्गदर्शन करणार आहेत. विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य असून दिलेल्या संकेतस्थळावर नोंदणी 
आवश्‍यक आहे.

शनिवार, ता. २२ एप्रिल २०१७
वेळ : सायंकाळी ५.३० वा.
स्थळ : राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवन, दसरा चौक, कोल्हापूर
विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य
नोंदणी आवश्‍यक : http://www.vidyaseminars.com/
नावनोंदणीसाठी संपर्क- सूरज : ९५५२५८१९१८

Web Title: iit-jee exam