करांडेवाडीत बेकायदा बैलगाडी शर्यतींचे आयोजन...कडेगाव पोलीस ठाण्यात सहाजणाविरुद्ध गुन्हा दाखल 

संतोष कणसे 
Wednesday, 16 September 2020

कडेगाव (सांगली)-   करांडेवाडी (ता. कडेगाव) येथे सर्वोच्च न्यायालयाच्या बैलगाडी शर्यतबंदी आदेशाचे उल्लंघन करून व कोरोनाचा धोका वाढला असतानाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न धाब्यावर बसवून बेकायदा बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याची व बैलांना क्रूरपणाची वागणूक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याबाबत कडेगाव पोलीस ठाण्यात आज सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

कडेगाव (सांगली)-   करांडेवाडी (ता. कडेगाव) येथे सर्वोच्च न्यायालयाच्या बैलगाडी शर्यतबंदी आदेशाचे उल्लंघन करून व कोरोनाचा धोका वाढला असतानाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न धाब्यावर बसवून बेकायदा बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याची व बैलांना क्रूरपणाची वागणूक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याबाबत कडेगाव पोलीस ठाण्यात आज सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

याप्रकरणी उमेश चंद्रकांत मुळीक (रा. शाळगाव,ता.कडेगाव ), दत्तात्रय दिनकर कारंडे ( वय-48 रा.रिसवड,ता कराड),संजय शंकर गायकवाड (वय-45 रा.गोवे,जि सातारा),कृष्णत विलास डांगे (वय- 38 रा.सैदापुर,ता.कराड जि.सातारा),अक्षय शिंदे (रा.सैदापुर,ता. कराड ) व अनोळखी एक असे एकूण सहा जणाविरुद्ध कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा चार चाकी वाहने असा एकूण सुमारे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,तालुक्‍यातील करांडेवाडी येथे आज दुपारी दोन वाजता जमीन गट नं.174 जिल्हा पुनर्वसन अधिकारी शासकीय मोकळ्या शेतात वरील आरोपीनी बैलगाडी शर्यतींचे आयोजन केले.या शर्यतीत संशयितांनी बैलांना गाडीला जुंपून त्यांना चाबकाचे फटके मारून अतिशय क्रूरपणाची वागणूक दिली.तसेच सर्वोच न्यायालायाच्या बैलगाडी शर्यतीवरील बंदीचा आदेश धाब्यावर बसवून बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले.तर सध्याच्या कोरोना पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश लागू केला असून देखील बेकायदा जमाव जमवून आदेशाचा भंग केला . प्रकरणी पोलीस विनायक जनार्दन कुंभार यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे हे करीत आहेत. 

 

""करांडेवाडी येथे बेकायदा बैलगाडी शर्यतींचे आयोजन केल्याची माहिती समजली होती. त्यानंतर तातडीने पोलिस मुख्यालयात तक्रार दिली. मुख्यालयातून कडेगाव पोलिसांना तत्काळ कळविण्यात आले. त्यानुसार ही कारवाई झाली. बेकायदा शर्यती होत असतील, तर तातडीने पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.'' 
- प्राणीमित्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal bullock cart races organized in Karandewadi. Case filed against six persons at Kadegaon police station