अवैध व्यवसायांचा उंब्रजला सुळसुळाट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

उंब्रज - परिसरात अवैध व्यवसायांचे जाळे मोठ्या प्रमाणामध्ये फोफावले आहे. वरिष्ठ पोलिसांनी त्यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, त्यात वरिष्ठांनाही अपयश आल्यासारखी अवस्था आहे. काही दिवस अवैध धंदे बंद केले. मात्र, ते पुन्हा नव्या जोमाने सुरू होताना दिसत आहेत. 

उंब्रज - परिसरात अवैध व्यवसायांचे जाळे मोठ्या प्रमाणामध्ये फोफावले आहे. वरिष्ठ पोलिसांनी त्यावर ठोस उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, त्यात वरिष्ठांनाही अपयश आल्यासारखी अवस्था आहे. काही दिवस अवैध धंदे बंद केले. मात्र, ते पुन्हा नव्या जोमाने सुरू होताना दिसत आहेत. 

उंब्रज पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हद्दीतील गावांमध्ये फोफावलेल्या अवैध धंद्यांवर मध्यंतरी छापे टाकण्यात आले. मात्र, काही पोलिसच अवैध धंदे असलेल्यांच्या गळ्यात गळे घालून गावात फिरताना दिसत आहेत. त्यांचे पाठबळ हीच अवैध धंदे वाढीचे मूळ आहे. याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा मोठ्या प्रमामात सुरू आहे. त्याला वेळीच आवर घालण्याची आवश्‍यकता आहे. मूळच्या अवैध धंदेवाल्यांचे अवैध धंदे जोमाने सुरू असताना काही नवीन अवैध धंदेवाले आपली दुकाने मांडून आपले बस्तान बसवताना दिसत आहेत.

त्यात वाट्टेल ते करण्याची तयारी दिसत आहे. देशी दारू चोरून विकणारे बऱ्याच वेळा चायनीज गाड्यांचा आसरा घेत आहेत. विनानंबर प्लेटची चारचाकी वाहने रात्री दारू बॉक्‍स भरून फिरताना दिसत आहेत. त्यावर कोणीही कारवाई करताना दिसत नाही. उलट त्याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. मात्र, वरिष्ठांच्या कारवाईने स्थानिकांच्या अर्थपूर्ण व्यवहारावर टाच येताना दिसत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. स्थानिक पोलिस अद्याप झोपेचे सोंग घेत आहेत. पोलिसातील काही ‘दादा’ लोक अवैध धंदेवाल्यांच्या गळ्यात गळे घालून फिरत असल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

वर्दीतील ‘दादां’कडे लक्ष द्या
पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वर्दीतील या ‘दादा’ लोकांवर लक्ष ठेवून कारवाई केल्यास अवैध धंद्यावर नियंत्रण येऊ शकते, असा विश्‍वास सर्वसामान्य नागरिक व्यक्त करताना दिसत आहेत.

Web Title: illegal business crime police