अवैध धंद्याकडे होणार नाही कानाडोळा : नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे

The illegal business will not be neglected says Newly appointed Police Commissioner Ankush Shinde
The illegal business will not be neglected says Newly appointed Police Commissioner Ankush Shinde

सोलापूर : 'अवैध धंद्याकडे पोलिसांकडून कानाडोळा होणार नाही. गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. नागरिकांनी तक्रार देण्यासाठी धाडसाने पुढे यावे. महिला सुरक्षेच्या अनुषंगाने दामिनी पथकातील महिला पोलिसांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सायबर सुरक्षेला प्राधान्य असेल,' असे नूतन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले. 

सोलापूरचे पोलिस आयुक्त म्हणून शिंदे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला आहे. या पार्श्‍वभूमीवर 'सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, 'महिलांच्या सुरक्षेकरिता पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दामिनी पथक कार्यरत आहे. हे दामिनी पथक अधिक सक्रिय करण्यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला समस्या निवारण केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल. एकत्र कुटुंब पद्धती टिकून रहावी या अनुषंगाने तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शन करणे आवश्‍यक आहे.'

शहरात कोणत्याही ठिकाणी आक्षेपार्ह, संशयित हालचाल दिसून आली तर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवावे. कोणत्याही भागात वाहतुकीच्या नियमांचे पालन होत नसेल तर तत्काळ शहर वाहतूक नियंत्रण शाखेशी संपर्क साधावा. शहरात कोणत्या ठिकाणी अवैध धंदे सुरू असतील तर यापुढे पोलिसांकडून काणाडोळा केला जाणार आहे. दहशतवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहेच, पण प्रत्येक नागरिकांनीही पोलिसांचे कान आणि डोळे व्हायला हवे. कोणतीही संशयास्पद वस्तू, व्यक्ती दिसून आली तर तत्काळ पोलिसांना कळवावे. एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या संस्था, संघटनेसोबत तरुणांचा वावर वाढला असेल तर त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी, असे पोलिस आयुक्त शिंदे यांनी सांगितले. 

सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने पोलिसांना अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शाळा-महाविद्यालयांत विद्यार्थ्यांशी संवाद वाढविण्यात येईल. सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने प्रबोधन करण्यात येईल. पोलिस ठाण्यात तक्रार करूनही कोणी दखल घेत नसेल थेट माझ्याकडे यावे. 
- अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com