वनमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी वीजचोरी !

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 मे 2017

सातारा : गुरेघर (ता. महाबळेश्‍वर) येथील जैवविविधता पार्कच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी खांबावर चक्क आकडा टाकून घेतलेली वीज वापरण्यात आली. हा प्रकार प्रसार माध्यमांनी उद्‌घाटक वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ते थोडे खजील झाले. परंतु स्वतः:ला सावरत संबंधित प्रकाराची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. 

जैवविविधता पार्कच्या उद्‌घाटन कार्यक्रमाला मुनगंटीवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, वन विभागाचे सचिव विकास खार्गे, अतुल चड्डा आणि वन व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी व्यासपीठा शेजारीच असलेल्या विजेच्या खांबावर आकडा टाकून वीज घेण्यात आली होती. ही बाबत कार्यक्रम संपल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी श्री. मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर ते संतप्त झाले. मुळात कार्यक्रमापूर्वीच ही बाब आमच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे होते, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

Web Title: Illegal Electricity connection for Sudhir Mungantiwar's proragm