सांगली : विट्यात मनसेच्या प्रयत्नाने अवैध धान्यसाठ्याचा घोटाळा उघडकीस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 January 2021

त्यामुळे सदरचा धान्य साठा अवैध असून काळा बाजार विक्रीच्या दृष्टीने आणल्याचे दिसून आल्याने गोडाऊन सील केले आहे. 

विटा (सागंली) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत ऊर्फ फायटर यांच्या आदेशाने खानापूर तालुका अध्यक्ष साजिद आगा यांच्या नेतृत्वाखाली मनसे टीमने खानापूर तालुक्‍यातील गोरगरिबांच्या हक्काचे धान्य नायब तहसीलदार व धान्य पुरवठा अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले व खूप मोठा धान्याचा घोटाळा उघडकीस आला.

येथील कराड रोडवर असलेल्या शेडमध्ये धान्य असल्याचे नायब तहसीलदार व अन्नपुरवठा अधिकारी त्याच बरोबर पोलीस स्टेशन अधिकारी यांच्या समक्ष गोडावून उघडून तेथील २२१ तांदळाची पोती व ९८ गव्हाची पोती या मोठ्या घोटाळ्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकऱ्यांनी कारवाई कारवाईसाठी प्रयत्न केले. यावेळी तालुका सचिव कृष्णा देशमुख तालुका उपाध्यक्ष विनोद कांबळे, तालुका उपाध्यक्ष सूरज तांबोळी, मिलिंद पवार, अपुल बुधावले, विशाल ईदाते, दीपक हराळे, वाहिद आगा व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - द्राक्ष बागेवर कामाला गेल्याशिवाय कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही

 

‘येथील कराड रोडवरील शेडमध्ये आढळून आलेल्या धान्याबाबत यांच्या ताब्यात सध्या शेड आहे त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे सदरचा धान्य साठा अवैध असून काळा बाजार विक्रीच्या दृष्टीने आणल्याचे दिसून आल्याने गोडाऊन सील करून जीवनावश्‍यक वस्तू अधिनियम कलमान्वये फिर्याद दाखल करणे बाबत पुरवठा निरीक्षक यांचेमार्फत कार्यवाही सुरू आहे.‘ अशी माहिती तहसीलदार शेळके यांनी दिली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal food grains godawan seal by manase activists in vita sangali