बेकायदा गुटका प्रकरणी तिघांना 106 कोटींची नोटीस

बेकायदा गुटका प्रकरणी तिघांना 106 कोटींची नोटीस

मिरज - बेकायदा गुटखा तयार करून त्याची विक्री केल्याप्रकरणी जयसिंगपूर, हरिपूर आणि चिप्री (ता. हातकणंगले) येथील तिघांना केंद्रीय जीएसटी विभागाने १०६ कोटी रुपयांच्या वसुलीची अंतिम नोटीस बजावली आहे. नोटीस बजावलेल्यांमध्ये कारखान्याचा मालक विलास नागेश जमदाडे (रा. हरिपूर), भागीदार दत्तात्रय दलवाई (रा. जयसिंगपूर) आणि गुटखा कारखान्याचा व्यवस्थापक कुमार कचरे यांचा समावेश आहे.

अधिक माहिती अशी, की जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथे १५ नोव्हेंबर २०१५ रोजी अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सागर आणि विमल या नावाने बेकायदा गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. पोलिस संरक्षणात झालेल्या या कारवाईवेळी गुटखा तयार करण्याची दोन यंत्रे, तयार गुटखा, गुटखा तयार करण्यासाठीचा कच्चा माल असे कोट्यवधींचे साहित्य जप्त केले. कारवाईनंतर या प्रकरणात तत्कालीन केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने लक्ष घातले आणि त्यांची कारवाई सुरू केली. या बेकायदा गुटखा उत्पादनाबाबत केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने दोन वर्षे चौकशी केली आणि पहिली नोटीस १६ फेब्रुवारी २०१७ रोजी दिली. यात केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने या तिघांना ४७ कोटी ४० लाखांचा चुकवलेला केंद्रीय अबकारी कर भरण्यास सांगितले.

या तिघांनी ही रक्कम अद्याप भरली नसल्याने आज केंद्रीय उत्पादन शुल्क तथा केंद्रीय जीएसटी विभागाने ४७ कोटी ४० रुपयांचा अबकारी कर, त्यावर प्रतिवर्षी १८ टक्के दराने ४७ कोटी ४० लाख रुपयांचा दंड या रकमेचा समावेश केला आहे. या ९४ कोटी ८० लाख रुपयांची जबाबदारी केंद्रीय जीएसटी विभागाने विलास नागेश जमदाडे (रा. हरिपूर) याच्यावर निश्‍चित केली आहे. तर या कारखान्यातील भागीदार दत्तात्रय दलवाई (रा. जयसिंगपूर) याला १० कोटी रुपये आणि कारखान्याचा व्यवस्थापक कुमार कचरे याच्यावर एक कोटी रुपये दंडाची जबाबदारी निश्‍चित करून त्यांनाही या कारवाईच्या अंतिम नोटिसा दिल्या आहेत. या कारवाईवेळी मुख्य मालक विलास जमदाडे याला अटकही झाली होती. त्यानंतर आता केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाने आज याच तिघांना १०६ कोटी रुपयांची नोटीस बजावल्याने बेकायदा गुटखा बनविणाऱ्यांना कारवाईपूर्वीचा एक मोठा झटका केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाकडून बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com