बेकायदा रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

कोल्हापूर - बेकायदा देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर बाळगणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने आज अटक केली. तानाजी महादेव पालकर (वय ३६, रा. नांगरे माळ, पाडळी खुर्द, ता. करवीर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून देशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हरसह आठ जिवंत काडतुसे, असा ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

जिल्ह्यात बेकायदा शास्त्रे बाळगणाऱ्या व अशा लोकांना आश्रय देणाऱ्या लोकांची महिती मिळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने यासाठी दोन तपास पथके नेमली आहेत.

यातील पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकातील सहायक फौजदार विजय गुरखे, श्रीकांत मोहिते, विजय कारंडे यांना पाडळी खुर्द येथील तानाजी पालकर हा देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर वापरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने आज सापळा रचून त्याला नवीन वाशी नाका परिसरातील एका मंगल कार्यालयाजवळून पालकर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने रिव्हॉल्व्हर वापरत असल्याची कबुली दिली.

याबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे त्याला दाखवता न आल्याने पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडील रिव्हॉल्व्हरसह ८ जिवंत काडतुसे असा ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पालकरने रिव्हॉल्व्हर कोठून मिळवले? कधीपासून तो याचा वापर करत आहे? याचा सखोल तपास होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी दिली. उत्तम सडोलीकर, किरण गावडे, सुजय दावणे, श्रीकांत पाटील, वैभव पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal revolver arrested in Kolhapur