तहसीलदारांनी वेश बदलून केली कारवाई

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

टाकळी ढोकेश्वर, (जि. नगर) - वेश बदलून दुचाकीवर तास (ता. पारनेर) येथील मुळा नदीत जाऊन तहसीलदार भारती सागरे यांनी आज दुपारी अवैध वाळूउपसा करणारा जेसीबी व ट्रॅक्‍टर पकडला.

टाकळी ढोकेश्वर, (जि. नगर) - वेश बदलून दुचाकीवर तास (ता. पारनेर) येथील मुळा नदीत जाऊन तहसीलदार भारती सागरे यांनी आज दुपारी अवैध वाळूउपसा करणारा जेसीबी व ट्रॅक्‍टर पकडला.

तास परिसरातील मुळा नदीतून जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाळूउपसा होत असल्याची माहिती सागरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी दोन्ही वाहने जप्त करून पारनेर येथील तहसील कार्यालयात आणली. कारवाईची माहिती मिळताच अनेकांनी नदीतून पळ काढला. याबाबत सागरे म्हणाल्या, 'शासकीय वाहनाने कारवाईसाठी जात असल्याने त्याची माहिती अगोदरच वाळूचोरांपर्यंत पोचते. त्यामुळे दुचाकीवर जाऊन ही कारवाई केली. संबंधितांनी दंड न भरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल.''

Web Title: illegal sand theft crime