मलकापूरमधून गावठी पिस्तूल जप्त

मलकापूरमधून गावठी पिस्तूल जप्त

कऱ्हाड : शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीच्या दरम्यान मलकापूर (ता. कऱ्हाड) येथून एक गावठी पिस्तुल जप्त केले. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे चौकशी सुरु करण्यात आली आहे. 

महिनाभरापासुन सातारा जिल्ह्यात बेकायदेशीररित्या पिस्तुल जवळ बाळगणाऱ्यांवर सातारा स्थानिक गुन्हे शाखा आणि कऱ्हाडच्या स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेने कारवाईचा धडाका सुरु केला आहे.

त्याअंतर्गत पिस्तुलसह अन्य शस्त्रे जप्त करुन संशयीतांनाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दोन दिवसापूर्वीच पार्ले (ता. कराड) येथील युवकाकडून कऱ्हाड (जि.सातारा) येथील बसस्थानकावर पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर काल रात्रीच मलकापूर येथेही पिस्तुल जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com