सांगलीच्या न्यायालय परिसरातील धर्मस्थळे हटवली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सांगली - येथील नवीन न्यायालयीन इमारतीजवळील अनधिकृत धार्मिक स्थळे आज हटवण्यात आली. उच्च न्यायालयाच्या यापुर्वीच्या आदेशानुसार महापालिका व जिल्हाधिकारी, पोलिस दलाने आज संयुक्तपणे ही कारवाई केली. 

सांगली - येथील नवीन न्यायालयीन इमारतीजवळील अनधिकृत धार्मिक स्थळे आज हटवण्यात आली. उच्च न्यायालयाच्या यापुर्वीच्या आदेशानुसार महापालिका व जिल्हाधिकारी, पोलिस दलाने आज संयुक्तपणे ही कारवाई केली. 

या धार्मिक ठिकाणाबाबत यापुर्वीच आयुक्तांनी नोटीस दिली होती. या स्थळांचा कोणताही अधिकृत ट्रस्ट नाही. त्यामुळे येथे पूजाअर्चा करणाऱ्यांसोबत प्रशासनाच्यावतीने चर्चा करून ही कारवाई करण्यात आली. त्याआधी लेखी नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार आज पहाटे ही कारवाई झाली. तेथील धार्मिक प्रतिके मुर्ती सुरक्षित स्थळी हलवली आहेत. रस्त्याकडील धार्मिक स्थळाचे बांधकामही हटवले आहे. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: illigal Religious Places removed in sangli court region