मंगळवेढ्यात आचारसंहितेच्या अंमलबजावणीला सुरुवात

मंगळवेढ्यात आचारसंहितेच्या अंमलबजावणीला सुरुवात

मंगळवेढा - लोकसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता काल जाहीर झाल्यापासून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना दिल्या आहेत. मंगळवेढा नगरपालिकेनेही आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून, दामाजी रोडवर असलेले झेंडे काढण्यात सुरुवात केली.

गेल्या आठवड्याभरापासून राजकीय निरीक्षकांचे निवडणूकीची रणधुमाळी कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागले होते. अशा परिस्थितीत काल सायंकाळी साडेपाच वाजता निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा जाहीर केली. आणि शहरासह ग्रामीण भागात राजकीय गप्पाचा फड रंगू लागला. लोकसभेचा उमेदवार कोण असणार यांच्या बरोबर जनावरांचा चारा पाणी रोजगार याची चिंता लागून राहिली आहे. नगरपालिकेच्या वतीने शहरातील प्रमुख चौकातील रोडवर असणारे विविध प्रकारचे झेंडे स्वतःहून उतरण्यास सुरुवात केली तर महसूल विभागाच्या निवडणूक शाखेने ग्रामीण भागात हे त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली असून, प्रत्येक गावोगावी भेटी देऊन गावपातळीवर राजकीय नेत्यांना आपापल्या पक्षाचे झेंडे बॅनर पोस्टर काढून घेण्यास सूचना देण्यात आल्या. 

यंदाच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने आचारसंहीतेच्या अमंलबजावणीसाठी स्वंतत्र अॅप तयार केले असून, मोबाईलवरून फक्त फोटो काढून त्या ॲपवर टाकून याबाबत तक्रार दाखल केल्यास संबंधितांवर कारवाई होणार असल्यामुळे याची धास्ती सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आहे. आपले बॅनर झेंडे उतरवून घेण्यास सुरुवात केली. असतानाच ज्या ठिकाणी राहिलेले आहेत त्या ठिकाणी नगरपालिकेने अंमलबजावणीस सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com