कोल्हापूर, सांगलीत पूरग्रस्तांनो, मदतीसाठी येथे साधा संपर्क

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 August 2019

कर्नाटकातील अलमट्टी धरणातूनही विसर्ग सुरू असल्याने पूरस्थिती ओसरायला लागेल, अशी शक्यता आहे. मात्र, या सर्व शक्यता आहेत. सध्याची परिस्थिती अनिश्चित आहे. 

कोल्हापूर : कृष्णा खोऱयात महापुराचे थैमान सुरू आहे. कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या महापुराने कोल्हापूर आणि सांगली ही दक्षिण महाराष्ट्रातील दोन्ही शहरे अभूतपूर्व संकटात आहेत. कोल्हापुरात नौदल आणि सागरी सीमा सुरक्षा दलाचे बचाव पथक दाखल झाले आहे.

kolhapur flood

सरकारी आकडेवारीनुसार, दोन्ही जिल्ह्यांतील 65 हजार पूरग्रस्तांचे स्थलांतर केल्याची माहिती असली, तरी प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी पटीने जास्त असण्याची शक्यता आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे बंद झाले असल्याची माहिती मिळते आहे. कर्नाटकातील अलमट्टी धरणातूनही विसर्ग सुरू असल्याने पूरस्थिती ओसरायला लागेल, अशी शक्यता आहे. मात्र, या सर्व शक्यता आहेत. सध्याची परिस्थिती अनिश्चित आहे. 

आपत्कालीन परिस्थितीतील संपर्क क्रमांक
कोल्हापूर जिल्हा स्तर नियंत्रण कक्ष: 
02312659232
02312652950
02312652953
02312652953
किंवा टोल फ्री क्रमांक : 1077
पोलीस नियंत्रण कक्ष : 02312666233 
वाहतूक शाखा नियंत्रण कक्ष : 02312641344
पाटबंधारे नियंत्रण कक्ष : 02312654735/36
कोल्हापूर महानगरपालिका कक्ष : टोल फ्री क्रमांक 101
महावितरण : 7875769103

कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे पूरग्रस्तांसाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था, जिल्हा न्यायालय, कसबा बावडा रोड, न्यायालय इमारतीमध्ये करण्यात आली आहे. संपर्क क्रमांकः 02312541295, 9860074233, 9404311970

सांगली जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षः 09370333932

kolhapur


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: important contact number for Kolhapur sangli flood victims