भुजबळ व शिंदे यांच्याकडे आली "ही' महत्त्वपूर्ण जबाबदारी

Ekanath Shinde, Chagan Bhujbal
Ekanath Shinde, Chagan Bhujbal

सोलापूर ः महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्‍न समन्वयक पदावरून भाजपचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांना आज हटविण्यात आले. त्यांच्या जागी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील सामान्य प्रशासन विभागाचा शासन आदेश आज सोमवारी जारी करण्यात आला.

15 डिसेंबर 2015 रोजी निर्णय
महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या अनुसूचीनुसार महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद हा विभाग सामान्य प्रशासन विभागाकडे सोपविण्यात आला आहे. हा विभाग मुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली आहे. महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद प्रश्‍नी प्रभावी पाठपुरावा करून विषयाला चालना मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यातील वकील व सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यात समन्वय साधणे, महाराष्ट्र - कर्नाटक सीमा प्रश्‍नासंदर्भात महाराष्ट्र शासनाने दावा केलेल्या 865 गावांतील जनतेचे प्रश्‍न सोडविणे यासाठी 15 डिसेंबर 2015 रोजी समन्वयक नियुक्तीचा निर्णय होऊन तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.

आता भुजबळ व शिंदे यांच्याकडे जबाबदारी
ऑक्‍टोबर 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे नवीन सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे 15 डिसेंबर 2015 चा आदेश रद्द करण्यात आला व श्री. पाटील यांची नियुक्ती रद्द करण्यात आली. त्यांच्या जागी आता श्री. भुजबळ आणि श्री. शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता हे दोन्ही मंत्री महाराष्ट्र व कर्नाटक सीमा वादासंदर्भात महाराष्ट्राची भूमिका प्रभावीपणे मांडणार आहेत. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकारी व सदस्यांबाबत चर्चा करून हा वाद संपविण्यासाठी पाठपुरावा करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com