गावाच्या विकासांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची महत्वाची भूमिका - अशोक शिंदे 

bhigwan.
bhigwan.

भिगवण - कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर श्रमसंस्कार खुप महत्वाचे असतात. हे श्रमसंस्कार योग्य वेळी तरुण पिढीमध्ये रुजविण्याची आवश्यकता असते. महाविदयालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना ही तरुण पिढीमध्ये श्रमसंस्कार रुजविण्याचे महत्वपुर्ण काम करते. तरुणपिढीवर श्रमसंस्कार व श्रमाच्या माध्यमातून गावाचा विकास अशी दुहेरी भुमिका निभावण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करते असे प्रतिपादन इंदापुर तालुका कॉंग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने येथील कला महाविदयालय, स्वामी चिंचोली (ता.दौंड) दत्तकला अभियांत्रिकी महाविदयालय व दत्तकला औषधनिर्माणशास्त्र महाविदयालय या तीन महाविदयालयांचे एकत्रित विशेष शिबीर तक्रारवाडी (ता.इंदापुर) आयोजित करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचे हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य संजय देहाडे, माजी सरपंच पराग जाधव, संपत बंडगर, सचिन बोगावत, कमलेश गांधी, डॉ. संकेत मोरे, रियाज शेख, सुरेश पिसाळ, तक्रारवाडीच्या सरपंच शोभाताई वाघ, उपसरपंच प्रशांत वाघ, तक्रारवाडी सोसायटीचे अध्यक्ष विकास वाघ,डॉ. महादेव वाळुंज,प्राचार्य अमोल कुलकर्णी उपस्थित होते.
    
प्रा. रामदास झोळ म्हणाले, वाढलेल्या स्पर्धेच्या युगामध्ये यशाचा मार्ग खडतर आहे. व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास झालेल्या युवकांना अनेक क्षेत्रामध्ये मोठ्या संधी आहेत. स्पर्धेमध्ये टिकायचे असेल तर तरुण पिढीला अधिक खंबीर व अनुभव संपन्न होण्याची आवश्यकता आहे. विकसित व्यक्तीमत्व घडविण्यामध्ये राष्ट्रीय सेवा योजना ही अत्यंत महत्वाची भुमिका बजावते आहे त्याचा योग्य उपयोग करुन घ्यावा. यावेळी तक्रारवाडीच्या सरपंच शोभाताई वाघ, प्राचार्य अमोल कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविक डॉ. महादेव वाळुंज, सुत्रसंचालन शाम सातर्ले, आभार दत्तात्रय कातोरे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेंद्र शिरसट, प्रतिम कुंभार, नवनाथ वलेकर यांनी केले. सात दिवस चालणाऱ्या या शिबारामध्ये जलसंधारण, वृक्षारोपन, आरोग्य तपासणी, ग्रामस्वच्छता, प्रबोधनपर व्याख्यानमाला आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com