नेसरीत औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयाचे उद्‌घाटन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

नेसरी - शिक्षणातून नवीन पिढी व समाज घडत असतो, असे प्रतिपादन शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी येथे केले. 

येथील यशवंतराव रेडेकर औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा प्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, प्रभाकर खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्री. ठाकरे म्हणाले, ""स्व. बाळासाहेब ठाकरे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करीत असत. त्यांच्याच विचारावर शिवसेनेची वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्रात आरोग्य शिबिरे भरवून सदृढ महाराष्ट्र घडविण्याचा प्रयत्न आहे. शमनजी यांनी कृषी, फार्मसी महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात चांगले काम करीत आहेत. युवा पिढी घडविण्यासाठी शिवसेना पाठबळ देईल. विद्यार्थ्यांनी आत्मविश्‍वासाने पुढे जावे. उद्योग निर्मितीसाठी काम करावे. कोणत्याही क्षेत्रात काम करा, पण गरुढ झेप घेण्याची हिंम्मत ठेवा. युवासेना आपल्या पाठीशी राहील.""

रियाज शमनजी म्हणाले, ""स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नेसरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षण संस्था उभी केली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तत्कालीन कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सहकार्य मिळाले. कृषी महाविद्यालयाद्वारे ग्रामीण भागात शेतीविषयक काम करण्याची संधी मिळाली आहे. जिल्ह्यात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न सुरु आहेत. एक सामान्य शिवसैनिक म्हणून प्रामाणिक काम सुरू आहे. 

यावेळी ठाकरे यांचा श्री. शमनजी, खजिनदार सुलोचना रेडेकर, सचिव लक्ष्मण कंग्राळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विनोद ठाकूर, आरमान शमनजी, रोशनबी शमनजी, कृषी कॉलेजचे प्राचार्य एम.जी. माळी, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एम. कुरबेट्टी, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एम. होसमनी आदी उपस्थित होते. विनायक पाटील यांनी सुत्रसंचालन केले. अजित पाटील यांनी आभार मानले. 

Web Title: Inauguration of the College of Natural Sciences in Nesari