राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन; बंगळूमधे शक्तीप्रदर्शन

बंगळूर - शरद पवार यांची कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्याशी भेट
Inauguration of NCP regional office Sharad Pawar meet D K Sivakumar Bangalore
Inauguration of NCP regional office Sharad Pawar meet D K Sivakumar Bangaloresakal

बंगळूर -राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने सोमवारी (ता.१८) बंगळूर येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी बंगळूर दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी बंगळूर येथे मोटरसायकल रॅली काढली. बेळगावातील अनेक कार्यकर्तेही या रॅलीत सहभागी झाले होते. दरम्यान बंगळूर दौऱ्यात कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यानी शरद पवार यांची भेट घेतली. बंगळूर येथील विमानतळाजवळील हॉटल ताज इंटरनॅशनमध्ये ही भेट झाली.

यावेळी पवार व शिवकुमार यांच्यात सुमारे पाऊण तास चर्चा झाली. कर्नाटकातील विद्यमान राजकीय घडामोडींबाबत या भेटीत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. कर्नाटकात २०२३ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन व शक्तीप्रदर्शन पाहता राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढविली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दुपारी बारा वाजता पवार यांचे बंगळूरला आगमन झाले. त्यानंतर हॉटेल ताज इंटरनॅशनलमध्ये पवार व शिवकुमार यांची भेट झाली. या भेटीनंतर पवार हे बंगळूर शहरातील बाणसवाडी येथील पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी रवाना झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी भला मोठा हार घालून पवार यांचे स्वागत केले. विमानतळ ते बाणसवाडी हे अंतर सुमारे ३० किमी इतके आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विमानतळ ते बाणसवाडी पर्यंत मोटरसायकल रॅली काढली.

त्यात पक्षाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. चार महिन्यापूर्वी आर. हरी यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. हरी यांनीच बाणसवाडी येथे पक्ष कार्यालय सुरू केले आहे. त्या कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पक्षाचे राज्यभरातील कार्यकर्ते बंगळूरला गेले होते. पण सोमवारी पवार व शिवकुमार यांची झालेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. गतवर्षी ऑगस्ट महिन्यात पवार हे खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने बंगळूरला गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यानी पवार यांची भेट घेतली होती. बोम्मई यांची त्यावेळी नुकतीच मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. त्यामुळे ती भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com