राजर्षी शाहू समाधी स्मारकाचे दिमाखात लोकार्पण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 January 2020

हिरे-माणके, सोने उधळा, जयजयकार करा, जय राजर्षी शाहूराजा तुजला हा मुजरा, असे अभिमान गीत गात येथील नर्सरी बाग परिसरातील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. 

कोल्हापूर - हिरे-माणके, सोने उधळा, जयजयकार करा, जय राजर्षी शाहूराजा तुजला हा मुजरा, असे अभिमान गीत गात येथील नर्सरी बाग परिसरातील लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. 

Image

ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखदार सोहळा होणार झाला. कार्यक्रमास श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अध्यक्षस्थानी होते. दरम्यान, या वेळी महापौर ऍड. सूरमंजिरी लाटकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील उपस्थित होते. 

Image

सोहळ्याच्या निमित्ताने सारे शहर शाहूमय झाले असून शहरातील सर्व प्रमुख चौकांत राजर्षी शाहूंची पोस्टर्स झळकली आहेत. सर्व ऐतिहासिक स्थळांसह पुतळे आणि स्मारकांचा परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. काल (ता. 18)सकाळी बिंदू चौकातून निघालेल्या राजर्षी शाहू विचार दिंडीमध्ये दीड हजारहून अधिक शालेय विद्यार्थी सहभागी झाले. दुपारी हेरिटेज वॉक आणि सायंकाळी शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम रंगला. आज (रविवारी) लोकार्पण सोहळ्यापूर्वी राजर्षी शाहू सलोखा मंचच्या वतीने कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळापासून समता ज्योत रॅली झाली. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलित केली. शाहू जन्मस्थळापासून शाहू समाधी स्मारक असा या रॅलीचा मार्ग होता. राजर्षी शाहू छत्रपती समाधी सिद्धार्थनगर सहभाग कृती समितीतर्फे सिद्धार्थनगर परिसरातून भव्य रॅली निघाली. त्यात चित्ररथांसह पारंपरिक वाद्यांचा समावेश होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Inauguration of Rajarshi Shahu Samadhi Memorial in kolhapur